दहा लाखांची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

अपघाताच्या एका प्रकरणात मदत करण्यासाठी २ कोटींची मागणी करून, त्यातील १० लाखांची रक्कम स्वीकारताना मुंबई येथील लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सेलू या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे.
दहा लाखांची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले
दहा लाखांची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलेराजेश काटकर
Published On

परभणी : अपघाताच्या एका प्रकरणात मदत करण्यासाठी २ कोटींची मागणी करून, त्यातील १० लाखांची रक्कम स्वीकारताना मुंबई Mumbai येथील लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या Prevention Department पथकाने सेलू Selu या ठिकाणी उपविभागीय पोलीस Police अधिकाऱ्यांच्या काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांच्यासह दोघांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ही माहिती अशी की सेलू पोलीस ठाण्यांतर्गत ३ मे २०२१ दिवशी एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामधील मयताच्या पत्नीसोबत तक्रार दाराची मोबाईलवर संभाषणाची ऑडिओ क्लिप Audio clip व्हायरल Vira lझाली होती. ९ जुलै दिवशी सेलू या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदारास त्यांच्या कार्यालयात बोलून, 'तुझी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे.

यातून तुला बाहेर पडायचे असेल, तर तू मला २ कोटी रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते. तसेच कार्यालयात वारंवार बोलावून आणि फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने, मुंबई या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात २२ जुलै दिवशी तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी २३ जुलै दिवशी तक्रारीची पडताळणी केली आहे.

दहा लाखांची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले
तहसीलदारास तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी करून तडजोडीत, त्यामधील १ कोटी ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली आहे. यानंतर काही वेळातच तक्रारदाराच्या भावाकडून उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या कार्यालयाशी, संलग्न मानत पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गणेश चव्हाण यांना १० लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी सेलू या ठिकाणी पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल आणि पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्या विरोधात दाखल करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com