वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे चिठ्ठीत लिहून औरंगाबादमधील तलाठ्याची आत्महत्या!
वरिष्ठांच्या छळाला कंटाळून तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या!
वरिष्ठांच्या छळाला कंटाळून तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या! माधव सावरगावे
Published On

माधव सावरगावे

औरंगाबाद: वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या कामाची छळवणूक आणि मानसिक त्रासाला कंटाळून औरंगाबादमध्ये (Aurangabad) एका तलाठ्याने (Talathi) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीये. लक्ष्मण नामदेव बोराटे असं नाव आहे. ते ३६ वर्षाचे होते. लक्ष्मण बोराटे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलंय. चिठ्ठीमध्ये त्रास देणाऱ्यांमध्ये १२ ते १३ अधिकारी व कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांचीही नावे असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या;

औरंगाबाद शहरातील सातारा (Satara) परिसरातील रहिवाशी लक्ष्मण नामदेव बोराटे हे अपर तहसील कार्यालयात तलाठी पदावर कार्यतर होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक जावक विभागाला त्यांची नेमणूक होती. त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे इतरही काही कामकाजाची जबाबदारी होती. गेल्या काही महिन्यांपासून ते मानसिक त्रासाने ग्रासले गेले होते. बोराटे यांनी या त्रासाला कंटाळून रविवारी सकाळी घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. चिठ्ठीत त्रास देणाऱ्यांमध्ये १२ ते १३ जणांची नावे कार्यालयात चुकीचे कामे आणि जास्तीचे कामे करण्यास भाग पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे या चिठ्ठीत लक्ष्मण बोराटे यांनी लिहून ठेवली आहेत. छळ करणारे १२ ते १३ जणांची नावे असून त्यात काही महिलांचाही सहभाग आहे. चिठ्ठत नेमके काय आहे हे बोराटे यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी वाचून दाखविली आहे.

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या!
राज्यात प्राथमिक शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरलाच सुरू होणार- राजेश टोपे

"त्रास देतात म्हणून नोकरी सोडून देतो";

लक्ष्मण बोराटे हे मुळ सातारा गावातील रहिवाशी आहेत. वरिष्ठ अधिकारी आणि संघटनेतील कर्मचारी त्रास देतात म्हणून नोकरी सोडून देतो, असे लक्ष्मण महिनाभरापासून बोलत होते. ते आत्महत्या करतील असे कधी वाटले नव्हते. अधिकारी आणि वरिष्ठ चुकीचे कामे करायला लावत होते. या कामांमध्ये पुन्हा चौकशी होईल, जेलमध्ये जावा लागेल, असेही काही अधिकारी आणि कर्मचारी त्यांना धमकावत होते, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी सांगितले. लक्ष्मण बोराटे यांचा छळ करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com