रश्मी पुराणिक
मुंबई: कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांचा १८ हजार मतांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव केला आहे. आता या निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटलांचे हिमालयात जाण्याचे वक्तव्य चांगलेच व्हायरल होत आहे.
त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा आणि पोट निवडणूक लावावी निवडून नाही आलो तर राजकारणातून सन्यास घेईल आणि हिमालयात निघून जाईल अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने चंद्रकांत पाटलांसाठी (Chandrakant Patil) हरिद्वारचे थ्री टायर एसी तिकीट बुक करण्यात आले आहे. सध्या उन्हाळा त्यांना त्रास होऊ नये म्हणून एसी तिकीट बुक केल्याचे राष्ट्रवादीच्या (NCP) वतीने सांगण्यात आले आहे. तिकीटाबरोबर जेवनाचीही सोय करण्यात आल्याचं राष्ट्रवादीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
राज्यात अतिशय प्रतिष्ठेची ठरलेली निवडणूक म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभेची निवडणूक. राज्यातील सर्वच मातब्बर नेते कोल्हापुरात तळ ठोकून होते. आज त्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. कोल्हापूर उत्तरच्या मतदारांनी आपल्या निवडणुकीचा कौल महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बाजूने दिलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे.
भाजपने (BJP) या जागेवर आपणच निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु भाजपला धक्का बसला आहे. स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर या जागेवर पोट निवडणूक लागली होती. त्यात महाविकास आघाडीकडून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि आता त्यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विजयाने जाधव कुटुंबातील वातावरण भावूक झाले आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.