मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे यांना धमकीचा मेल, कडक कारवाईचे निर्देश

अहमदनगर जिल्ह्यातून एका माथेफिरुने शिवसेना नेत्यांना धमकीचा मेल पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv
Published On

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथेसंदर्भात ५ मे रोजी क्रांतिकारी निर्णय घेतला. या ग्रामपंचायतीने विधवा प्रथा निर्मूलनसाठी (widow tradition) ठरावही केला. मात्र, विधवा प्रथा बंद करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाबाबत एका माथेफिरुने निषेध व्यक्त करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray), विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam gorhe) यांना धमकीचा ई-मेल केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून एका माथेफिरुने धमकीचा मेल पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपसभापती कार्यालयाकडून अहमदनगर पोलीस (Police) अधीक्षक मनोज पाटील यांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

Uddhav Thackeray
दिलदार उदयनराजे भोसले! 'त्या' मुलीकडून सगळी पुस्तके घेतली विकत

या गंभीर प्रकाराबाबत निलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. विधवा प्रथा बंद करण्याच्या हेरवाड ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या पार्श्वभुमीवर रुपाली चाकणकर आणि निलम गोऱ्हे यांच्यासह विभागप्रमुख महिलांना धमकी देण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत धमकी देण्यासाठीचा फोन थेट राष्ट्रीय महिला आयोगाला करण्यात आला आहे. त्याआधी २५ तारखेला ईमेल देखील करण्यात आला आहे. चाकणकर यांच्याकडून यासदंर्भात पोलिस तक्रार देण्यात आली आहे, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

स्त्री आधार केंद्र, उपसभापती कार्यालय आणि विधवा सन्मान कायदा समिती अभियान यांच्यावतीने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी आदि जिल्ह्यातील सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांची एक 'परिवर्तन बैठक' दिनांक २७ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची आयोजनाची बातमी प्रसारित झाल्यावर अहमदनगर जिल्ह्यातील एका माथेफिरू व्यक्तीने मुख्यमंत्री, उपसभापती कार्यालय , स्त्री आधार केंद्र तसेच अन्य मान्यवरांना हेरवाडच्या या निर्णयाचे समर्थन करणारे कार्यक्रम न घेण्याबाबत एक मेल २५ मे २०२२ पाठविला. सदर निवेदनात पत्रलेखकाने त्याच्या स्व:त:च्या आईला कोपर्डी अथवा कोठेवाडी येथे नेऊन बलात्काराची धमकी दिली आहे.

Uddhav Thackeray
पहिली इलेक्ट्रिक बस धावणार, 'शिवाई'चा १ जूनला पुण्यात लोकार्पण सोहळा

विधान परिषद, उपसभापती कार्यालयाने या विषयाची गंभीर दखल घेतली असून याबाबत अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना संबंधीत व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे. सदरील व्यक्ती मनोरुग्ण असून तो समाजात विकृत पद्धतीचे संदेश देणारे काम करत असतो. दरम्यान, हे प्रकरण अतिशय गंभीर असून याबाबत कडक कारवाई लवकरच करण्यात येईल, अशी माहिती शेवगावचे पोलीस उपअधीक्षक मुंडे यांनी दिलीय.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com