Bhandara : ओबीसींच्या वसतिगृहासाठी भंडारा जिल्ह्यातील हजाराे विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना धाडले पत्र

भंडारा जिल्ह्यातून लाखो पत्र पाठविली जाणार आहेत असे संयाेजकांनी नमूद केले.
thousands of students from bhandara writes letter to cm eknath shinde demands hostel for obc
thousands of students from bhandara writes letter to cm eknath shinde demands hostel for obcsaam tv

- शुभम देशमुख

Bhandara News :

भंडारा जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह (obc hostel) व्हावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना पत्र लिहून केली आहे. तब्बल एक हजार पत्रांद्वारे विद्यार्थ्यांनी ओबीसी समाजाच्या मागण्या आणि वसतिगृहाची मागणी केली आहे. (Maharashtra News)

राज्यात ओबीसी समाजाचा मोठा वर्ग असून सुध्दा ओबीसी समाजाच्या अनेक मागण्या रेंगाळल्या आहेत. राज्यभर प्रत्येक जिल्हयात ओबीसी वसतिगृह 15 ऑगस्ट पूर्वी तयार करणार असल्याची ग्वाही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

thousands of students from bhandara writes letter to cm eknath shinde demands hostel for obc
Akola ZP By-Election Result: अकोला जिप पोटनिवडणुकीत 'वंचित'ने राखला गड, योगेश वडाळ विजयी

भंडारा जिल्हयात शेतकरी शेतमजूर यांची मुल आहेत. 12 वी पर्यंत ग्रामीण भागात शाळा कॉलेजेस आहेत. परंतु पुढील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याना शहरात जावे लागते. त्यामुळे शहरात भाड्याने खाेली घेऊन राहणे परवडत नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे शहरात ओबीसी वसतिगृह लवकरात लवकर व्हावे यासाठी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने सिहोरा येथील ओबीसी विद्यार्थ्यांनी 1000 पत्र मुख्यमंत्री यांना लिहले आहे. याबराेबरच भंडारा जिल्ह्यातून लाखो पत्र लिहले जाणार आहेत अशी माहिती संजय मते (ओबीसी क्रांती मोर्चा संयोजक) यांंनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

thousands of students from bhandara writes letter to cm eknath shinde demands hostel for obc
Wardha: समृद्धी महामार्ग बस अपघात प्रकरण; प्रवाशांच्या नातेवाईक न्यायाच्या प्रतिक्षेत, बेमुदत उपाेषणाचा सहावा दिवस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com