जंगला पासून ते मोबाईल पर्यंत सर्व काही आहे या डिजीटल शाळेत; वाचा सविस्तर

कुशालद्दीन शेख या उपक्रमशील शिक्षकाने स्वतः चार लाख रुपयांचा खर्च करुन डिजीटल (Pandharpur Digital School) जंगल शाळा तयार केली आहे.
 डिजीटल शाळा
डिजीटल शाळाभारत नागणे

पंढरपूर- विद्यार्थी आणि पालकांमध्ये कोरोना (Coronavirus) विषयी असलेली भिती कमी व्हावी. मुलांना आनंदी आणि उत्साही वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी सांगोला तालुक्यातील तरंगेवाडी अंतर्गत येणाऱ्या सांगोलकर गवळीवस्तीच्या प्राथमिक शाळेतील कुशालद्दीन शेख या उपक्रमशील शिक्षकाने स्वतः चार लाख रुपयांचा खर्च करुन डिजीटल (Pandharpur Digital School) जंगल शाळा तयार केली आहे.

डिजीटल क्लासरुम मध्ये प्रवेश केल्यानंतर विद्यार्थी जंगलात बसून शिक्षण घेत असल्याचा अनुभव घेतात. डिजीटल क्लासरुम या अभिनव उपक्रमामुळे वाड्यावस्तीवर राहणाऱ्या गरीब मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे, शिवाय गळतीचे प्रमाण देखील कमी झाले आहे. डिजी़टल क्लासरुम निर्मितीचा हा प्रयोग राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी आदर्श ठरला आहे.

 डिजीटल शाळा
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं, पण ती घटना घडली

साडेपाच हजार शिक्षकांनी नाकारलेल्या याच प्राथमिक शाळेला शेख गुरुजींनी वैभव मिळवून दिले आहे. सांगोलकर गवळीवस्ती ही दोन शिक्षकी शाळा आहे. येथे चौथी व पाचवीसाठी एकचवर्ग असून 22 विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु मागील दीड ते दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे विद्यार्थी शाळेत न जाता. आॅनलाईन पध्दतीने शिक्षण घेत आहेत. कोरोनाला दूर ठेवून जगलं पाहिजे हा सकारात्मक विचार करुन येथील प्राथमिक शिक्षक कुशालद्दिन शेख यांनी बॅंकेचे व फायनान्सचे चार लाख रुपये कर्ज काढून डिजीटल शाळा तयार केली आहे. या क्लासरुमध्ये विविध पक्षांची, प्राण्याची, झाडांची, फळा फुलांची आकर्षक चित्रे लावण्यात आली आहेत.

घनदाट जंगलातील रात्रीच्या वेळचा विद्यार्थ्यांना भास व्हावा यासाठी डीजीटल दिवेही लावण्यात आले आहेत. त्या सोबत डाॅल्बी साऊंड सिस्टिमद्वारे जंगलातील आवाजाचा इफेक्ट दिला आहे. यातून विद्यार्थ्यांना वाहते पाणी, वारा, पक्षी व प्राण्यांचे आवाज कोसळणारा पाऊस याचा फिल येतो. विशेष म्हणजे, हुबेहुब दिसणारी ही चित्रे खास बेंगलूरहून आणली आहेत. भिंतीवर आकर्षक रंगातील विविध चित्रे साकारण्यात आली आहेत. खाली हिरव्या रंगाचे मॅट टाकण्यात आले आहे. शाळेत प्रवेश करताच विद्यार्थ्यांना कुठेतरी जंगलात आल्याचा भास होतो. त्यामुळे विद्यार्थी या आनंदी वातावारणात आपलं सगंळ दुःख विसरुन वेगळ्याच विश्वात रममाण होतात.

शेख यांनी शाळेत स्वतंत्र ग्रंथालय तयार केले असून यामध्ये विविध प्रकारची 200 पुस्तके विकत आणली आहेत. संगणक, सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईल, लाॅपटाॅप असं अधुनिक साहित्यांनी ही शाळा परिपूर्ण केली आहे. गरीब 8 विदयार्थ्यांना शेख यांनी स्वखर्चातून मोबाईल ही दिेले आहेत. त्यासाठी लागणारा प्रत्येक महिन्याचा रिचार्च देखील तेच करतात. ऐवढेच नाही तर शाळेत विद्यार्थी काय करतात, अभ्यास कसा करतात, शिक्षक काय शिकवतात हे सगळं पालकांना त्यांच्या मोबाईवर घर बसल्या पाहाता देखील येते. शाळेतील 22 विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलला सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे जोडण्यात आले आहे.

शेख गुरुजींनी यापूर्वी माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे 10 वर्षे विद्यादानाचे काम केले. दरम्यान 2018 च्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णया नुसार राज्य भरातील 5 हजार 500 शिक्षक विस्तापीत झाले. त्यामध्ये शेख यांचा घालून पहिला नंबर होता. त्यामुळे साडेपाच हजार शिक्षकांनी नाकारेली ही शाळा त्यांना मिळाली. घरा पासून 95 किलोमीटरचा प्रवास करुन शेख गुरुजींनी या शाळेचा

 डिजीटल शाळा
14 जुलै 2021 राशिभविष्य

चेहरामोहरा बदलून शाळेचा नावलौकीक वाढवला.येथील शाळेला जाण्यासाठी आजही चांगला रस्ता नाही, रस्त्यापासून एक किलोमीटरची पायपीट करुनच शिक्षक व अधिकाऱ्यांना शाळेत यावे लागते. शाळेसाठी चांगला रस्ता करावा अशी अपेक्षा या निमित्ताने शेख गुरुजींनी व्यक्त केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com