Latur Corona: लातुरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात - पृथ्वीराज बीपी

15 ते 18 वयोगटातील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याच्या मोहिमेत अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांची उदासीनता दिसून येते म्हणून उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी 100 टक्के लसीकरण न करणाऱ्या शाळांच्या संच मान्यता रद्द करण्याची तंबीच आता थेट मुख्याध्यापकांना दिली आहे.
Prithviraj BP
Prithviraj BPदीपक क्षीरसागर
Published On

लातूर - मागील काही दिवसांपासून कोरोना (Corona)रुग्णाचा पॉझिटिव्हीटी रेट हा वाढत असून आता 3.63% झाला आहे. ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असल्याचे लातूरचे (Latur) जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी (Prithviraj BP) यांनी सांगितले आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे निलंगा (Nilanga) तालुक्यातील उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी 100 टक्के लसीकरण न करून घेणाऱ्या शाळांची संच मान्यता रद्द करणार असल्याची तंबी दिली आहे. (Latur Latest Corona Update)

जगात कोरोनाची धास्ती असतानाच ओमिक्रॉन (Omicron) या नव्या कोरोना व्हेरिएंटची धास्ती प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांनी घेतली आहे. मागील काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा फक्त 0.5 टक्के होता त्यात वाढ होऊन तो आता 3.63 टक्के झाला आहे. त्यामुळे लातुरात तिसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा -

नागरिकांनी हा व्हेरिएंट सौम्य आहे असं समजू नये प्रत्येक नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावे कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी केले आहे. शासनानं 15 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. लातूर जिल्ह्यातील काही शाळा आरोग्य विभागाशी सहकार्य करत 100 टक्के लसीकरण करण्याच्या कार्य करत आहे.

Prithviraj BP
Nashik Crime: 10 वर्षीय मुलीला जंगलात फासावर लटकवण्याचा प्रयत्न

परंतु 15 ते 18 वयोगटातील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याच्या मोहिमेत अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांची उदासीनता दिसून येते म्हणून उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी 100 टक्के लसीकरण न करणाऱ्या शाळांच्या संच मान्यता रद्द करण्याची तंबीच आता थेट मुख्याध्यापकांना दिली आहे. यातून प्रत्येक शाळातील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना लस मिळेल आणि कोणाच्या संकटापासून आपण मुलांचा बचाव करणं शक्य होऊ शकेल.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com