Amravati News: गॅस कटरने ATM मशीन फोडले, 17 लाख रुपये लंपास, CCTV मध्ये धक्कादायक कृत्य उघड

Latest News: याप्रकरणाचा तपास अमरावती पोलिस (Amravati Police) करत आहेत
Amravati ATM Break
Amravati ATM Break Saam TV

अमर घटारे, अमरावती

Amravati Police: अमरावतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank Of India) एटीएम मशीन (ATM Machine) फोडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी हे एटीएम मशीन फोडून तब्बल 17 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. गॅस कटरच्या मदतीने त्यांनी हे एटीएम मशीन फोडले. याप्रकरणाचा तपास अमरावती पोलिस (Amravati Police) करत आहेत

Amravati ATM Break
Jalgaon News: पाण्याची मोटर चालू करायला गेली अन्‌..चिमुलीचा विजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यू

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती तालुक्यातील जरूड येथे ही घटना घडली आहे. वानखडे पॅलेसमध्ये असलेल्या एसबीआय बॅकेच्या शेजारी असलेले एटीएम मशीन अज्ञात दरोडेखोरांनी फोडले. या एटीएम मशीनमधील तब्बल 17 लाख रुपये चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. ही एटीएम मशीन फोडताना दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. गॅस कटरच्या सहाय्याने त्यांनी हे एटीएम मशीन फोडले.

Amravati ATM Break
Beed News: संतापजनक! बीडमध्ये दांडीबहाद्दर डॉक्टरांमुळे गेला मजुराचा जीव; हॉस्पिटलच्या गेटवर तडफडून सोडला प्राण

सीसीटीव्ही टाईमनुसार, शुक्रवारी पहाटे 2.56 वाजता ही घटना घडली. तीन ते चार दरोडेखोर असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. लाल रंगाची T04 23 HR 2520 कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दरोडेखोरांनी गॅस कटरचा वापर करून हे एटीएम मशीन फोडले. त्यानंतर त्यांनी तब्बल 17 लाख रुपये घेऊन घटनास्थळावरुन फरार झाले. घटनेची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com