चोरट्यांनी फोडले चक्क 9 लाखांचे हिरे; हिऱ्यांचा केला चुराडा

चोरट्यांचा मूर्खपणा समोर
चोरट्यांनी फोडले चक्क 9 लाखांचे हिरे; हिऱ्यांचा केला चुराडा
चोरट्यांनी फोडले चक्क 9 लाखांचे हिरे; हिऱ्यांचा केला चुराडासंजय डाफ

नागपूर - हिरे ओळखण्यासाठी पारखी नजर असावी लागते असे म्हंटले जात आहे. हिर्‍याची पारख करता आली तरच खरा हिरा ओळखता येतो. याचा प्रत्यय नुकताच नागपुरात आला. आपण चोरलेले हे हिरे आहेत हे समजलेच नसल्याने एका आंतरराज्यीय टोळीतील लुटारूंनी तब्बल ९ लाखांचे हिरे अक्षरशः फोडून टाकले. काचा फोडाव्यात तसे या चोरट्यांनी हिरे फोडून फेकून दिले. ९ लाखांचे हिरे फोडून फेकणाऱ्या चोरांमुळे हिऱ्यांची पारख असावी लागते हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आणि या चोरट्यांचा मूर्खपणा पुढं आला आहे.

हे देखील पहा -

नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका आंतरराज्यीय टोळीला आसाममध्ये जाऊन अटक केली. ही टोळी धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये महिलांच्या पर्स चोरत असे. पोलिसांनी या चोरट्यांजवळून १० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे आहे. या टोळीला अटक करण्यासाठी तब्बल २० दिवस पोलीस पथक आसाममध्ये तळ ठोकून होते. आरोपी एसी कोचमध्ये आरक्षण करून प्रवास करायचे. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी आसामला जाऊन तपास सुरू केला आणि नयनमुनी चंद्रकांता मेधी, दीपज्योती चंद्रकांत मेधी आणि संजू रामनाराण राय या तिघांना सापळा रचून ताब्यात घेतले.

चोरट्यांनी फोडले चक्क 9 लाखांचे हिरे; हिऱ्यांचा केला चुराडा
धोरणात्मक बाबींवर राज्यातील नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही; सोनिया गांधींनी पक्ष नेत्यांना फटकारले

हे आरोपी एसी कोचमध्ये आरक्षण करून प्रवास करायचे आणि वाटेत महिला प्रवाशांच्या पर्स लांबवायचे. हावडा मेल नागपूरात येत असताना या ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या पर्स पाळविल्या. त्यांच्या पर्स मधील दोन हिरे लागलेल्या सोन्याच्या बांगड्या घेऊन हे चोरटे आसामला पळून गेले. यातील सोने वितळवून ते विकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी यावर लागलेले होरे कुठे आहेत हे विचारल्यावर ते फोडल्याचं या चोरट्यांनी सांगितलं. हिऱ्यांची पारख नसल्याचे चोरट्यांनी तब्बल 9 लाख रुपयांच्या हिऱ्यांचा अक्षरशः चुराडा केला.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com