राज्यात नवीन निर्बंध नाहीत; ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

फ्रंट लाईन वर्कर्सना बूस्टर देण्यासाठी NTAGI या संस्थेने भूमिका घ्यावी अशी मागणीही टोपे यांनी केली.
राज्यात नवीन निर्बंध नाहीत; ओमिक्रॉनच्या पार्श्ववभूमीवर आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान
राज्यात नवीन निर्बंध नाहीत; ओमिक्रॉनच्या पार्श्ववभूमीवर आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान Saam Tv
Published On

लक्ष्मण सोळुंके

जालना : केंद्रीय औषध मानक तज्ञ संस्थेची आज बैठक आहे या बैठकीतून आपल्याला लहान मुलांचं लसीकरण आणि बूस्टर डोस संदर्भात निर्णय होणं अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री टोपे (Rajesh Tope) यांनी दिलीय. ते जालन्यात (Jalna) बोलत होते. फ्रंट लाईन वर्कर्सना बूस्टर देण्यासाठी NTAGI या संस्थेने भूमिका घ्यावी अशी मागणीही टोपे यांनी केली. या संस्थेच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास तो स्वागतार्हच राहील असंही टोपे यांनी सांगितलं.(No new restrictions in the state Health Minister's big statement on Omicron Variant)

हे देखील पहा-

राज्यात सध्या नवीन निर्बंध लावले जाणार ?

राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नसल्याचं सांगत त्यांनी राज्यात नवीन निर्बंध लावले जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारकडून ओमायक्रॉनमुळे 31 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणाला स्थगिती देण्यात आली. महाराष्ट्रात उड्डाणाबाबत केंद्र सांगेल त्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी केली जाईल असंही टोपे यांनी सांगितलं.

परदेशातून राज्यात आलेल्यांचा शोध सुरु, वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन त्यांना शोधणार, त्यांच्या चाचण्या करणार महाराष्ट्रात संक्रमित व्यक्तीकडून कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. मात्र नागरिकांनी लसीकरण तातडीनं करून घ्यावे. कोरोना नियमांचं पालन करावे असंही ते म्हणाले.

औरंगाबादमधील 'त्या' आदेशाचं मी समर्थन करत नाही;

औरंगाबादमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दुसऱ्या डोसचे लसीकरण केल्याची खात्री करूनच विद्यार्थी आणि शिक्षकांना महाविद्यालयात बसू द्या अन्यथा बसू देऊ नका असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. या आदेशाचं मी समर्थन करत नाही. मात्र लसीकरण ऐच्छिक जरी असलं तरी ते गरजेचं आहे. आज जरी हा निर्णय कायद्यात बसत नसला तरी ते गरजेचं आहे असंही टोपे यांनी म्हटलं आहे.

राज्यात सध्या कोरोना संक्रमित व्यक्तींना आपण विलीगिकरण करत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आपण ट्रॅकिंग, टेस्टिंग केली जात आहे. जे लोक दोन महिन्यांपूर्वी राज्यात विदेशातून आलेले आहे त्यांना शोधून त्यांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी (Genome sequencing) पाठवले जात असल्याच टोपे यांनी सांगितलं.

परदेशातून आलेले अनेक जण बेपत्ता झाले असून त्यांना शोधण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेतली जात असून कोणत्याही परिस्थितीत या लोकांना शोधून त्यांची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

राज्यात नवीन निर्बंध नाहीत; ओमिक्रॉनच्या पार्श्ववभूमीवर आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान
CDS Bipin Rawat Funeral: बिपीन रावत यांना अश्रू नयनांनी अखेरचा सॅल्युट; पाहा फोटो

सांगलीत दक्षिण आफ्रिकेतुन आलेला एक रुग्ण दगावला आहे. या रुग्णाचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र त्याच्या चाचणीचा नमुना जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आला आहे याबाबत विचारलं असता याबाबत जिनोमिक सिक्वेसिंग अहवाल आल्यानंतरच बोलता येईल अशी माहिती टोपे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील मुंडेवाडी येथे आश्रमशाळेत 15 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. याठिकाणी जिनोमिक सिक्वेसिंग पूर्ण करून घेतलं जाईल. शिवाय अत्यावश्यक गोष्टी केल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय कामात ते मदत करत नसतील तर ते चुकीचं !

सोलापूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 55 सरपंचांना लसीकरण करण्यात मदत करत नसल्याप्रकर्णी नोटीस बजावली आहे. लसीकरणासाठी राज्यातील सरपंचांनी मदत करावी.त्यांच्या मदतीशिवाय लसीकरणाला वेग येणं शक्य नाही.ते जबाबदार लोकप्रतिनिधी गावस्तरावर असतात.त्यामुळे राष्ट्रीय कामात ते मदत करत नसतील तर ते चुकीचं आहे.त्यामुळे त्यांनी सहकार्य करावं असं आवाहन टोपे यांनी सरपंचांना केलंय.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com