Latur Crime News : डोळ्यात मिरचीपूड टाकून व्यापाऱ्याचे लुटले नऊ लाख

या घटनेचा पाेलिस तपास करीत आहेत.
Latur Crime News
Latur Crime NewsSaam Tv
Published On

Latur Crime News : व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून नऊ लाख पाच हजार रुपये लुटल्याची घटना लातूर (latur) जिल्ह्यात घडली आहे. या घटनेनंतर व्यापा-याने पाेलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पाेलिसांना सांगितला. पाेलिसांनी दाेन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. (Breaking Marathi News)

Latur Crime News
Nagpur : स्वत:च्या काेवळ्या मुलींवर लैंगिक अत्याचार; नराधम बापास दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

देवणी येथील बसस्थानकासमोरून गुरुवारी रात्री दुकान बंद करून घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून रोख रक्कम नऊ लाख पाच हजार रुपये लुटण्या आले. ऐन बाजारात भरवस्तीत व्यापाऱ्यास लुटल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवणी येथील व्यापारी उमाकांत जगदीश जीवने हे नेहमीप्रमाणे आपले दुकान गुरूवारी रात्री सव्वानऊ वाजता बंद करून पैशाची बॅग घेऊन घराकडे जात होते. त्यांना बसस्थानकासमोरील घराच्या वाटेवर अडवून दोन अज्ञात व्यक्तींनी डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्या जवळील नऊ लाख पाच हजार रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढला.

Latur Crime News
Beed Krushi Mahotsav 2023 : असा असेल उद्यापासून सुरु हाेणारा बीड कृषी महोत्सव

या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात (deoni police station) दोन अज्ञात व्यक्तिच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com