राज्याची उपराजधानीही कुपोषणाच्या विळख्यात; उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात कुपोषण

नागपूर जिल्ह्यातील १११७ बालके कुपोषित
Malnutrition
MalnutritionSaam Tv
Published On

नागपूर - राज्याची उपराजधानी असलेले नागपूर (Nagpur) कुपोषणाच्या विळख्यात सापडलंय. नागपूर जिल्ह्यात एकूण १११७ बालके कुपोषण (Malnutrition) असल्याची आकडेवारी जिल्हा परिषदेने जाहीर केलीय. यात हिंगणा, नागपूर ग्रामीण, सावनेर आणि रामटेक या तालुक्यात सर्वाधिक प्रमाण आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही कुपोषणाच्या शिरकावाने सरकारी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय.

राज्यातील आदिवासी व दुर्गम भागात कुपोषित बालके आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे कुपोषण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याला यश येत नाहीय. त्यात आता विकसित शहरांमध्ये सुद्धा कुपोषणाने शिरकाव केलाय. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात कुपोषित बालके आढळून आलीय.

हे देखील पाहा -

नागपूर जिल्हा परिषदेने केलेल्या जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये असलेल्या १ लाख ४० बालकांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात १११७ बालके कोपोषित असल्याची आकडेवारी पुढं आलीय. यात १८४ अति तीव्र कुपोषित तर ९३३ मध्यम तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत.

Malnutrition
Ganpati Bhog Recipes : विघ्नहर्त्या बाप्पाला या ५ पदार्थांचा नैवेद्य दाखवा, झटपट बनतील

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जुलै महिन्यातील कुपोषणाची आकडेवारी अधिक आहे. शासनामार्फत अंगणवाडी मध्ये असलेले बालकं, गर्भवती महिला, स्तनदा मातांना पोषक आहार दिला जातो. मात्र, तरीही बालकं कुपोषित राहत असतील तर हा आहार ही बालकं आणि मातांना मिळतोय का? असा प्रश्न निर्माण होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com