मानसिक रुग्णावर उपचार करण्यासाठी अघोरी विद्येचा वापर; पायात लोखंडी बेडी, हातही बांधले

पीडित तरुण हा मानसिक आजाराने त्रस्त असल्याने नातेवाईकांनी त्याला अनेक देवस्थानी नेलं.
Nashik News
Nashik Newsतबरेज शेख
Published On

नाशिक : नाशिक (Nashik) निफाड तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाचे हातपाय दोरीने बांधून अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या घटनेमुळे अद्यापही काही नागरिक अशा अघोरी विद्येच्या भरोवश्यावर असल्याचे सिद्ध झालं आहे.

पीडित तरुण हा मानसिक आजाराने त्रस्त असल्याने नातेवाईकांनी त्याला अनेक देवस्थानी नेलं. इतकेच नव्हे तर पायात लोखंडी बेडी घातली. परंतु त्याला फरक पडला नाही म्हणून त्यांनी शिरवाडे (वाकद) येथील एका भगताकडे नेले. त्याने पीडितासाठी अघोरी पूजा करावयास लागेल असं कुटुंबास सांगितलं. शिवाय त्यासाठी गोदावरी नदीत आंघोळ घालून अघोरी पूजा करण्यात येणार होती.

दरम्यान, मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास नातेवाईक व भगत मोरवीस येथे आले. गोदावरी नदीकाठी रहदारीपासून दूर अंतरावर एकांतात जमा झाले. गावकऱ्यांना हे संशयास्पद वाटल्याने ते तिथे गेले असता हा प्रकार समोर आला. मोरवीस गावचे पोलीस पाटील सोमनाथ पारखे व गावकरी गोरख कोकाटे यांनी तत्काळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Superstition Elimination Committee) नाशिक येथील कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

हे देखील पाहा -

चांदगुडे यांनी हा जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा असल्याचे नातेवाईकांना सांगितले. पीडितास मानसिक आजार असल्याने त्यास अशा अघोरी पूजेपेक्षा डॉक्टरांची गरज असल्याचे सांगितलं. त्यानंतर गावकऱ्यांनी पीडितास बांधलेल्या दोरातून मुक्त केल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीसांना घटनेची माहिती दिली. संबधित भगतावर कारवाई होण्याची मागणी केली. गावकऱ्यांच्या जागरुकतेमुळे अघोरी प्रयत्न थांबला आहे.

दरम्यान, शरीर जसे आजारी पडते तसे मनही आजारी पडू शकते. त्यामुळे रुग्णास साखळदंड, बेडी अथवा दोरात बांधून देवस्थानी ठेवत अघोरी कृत्य करणे योग्य नाही. त्यास मानसोपचारतज्ज्ञाची (Psychiatrist) गरज असते. अशा घटनांत अंनिसकडून समुपदेशन केले जाते. त्यामुळे नागरिकांनी अघोरी विद्येवरती विश्वास न ठेवता डॉक्टरांशी संपर्क साधवा असं अंनिसकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com