ऊस तोडणी रखडली, भात काढणी लांबली.. द्राक्षाचे घडही कुजले; अवेळी पावसामुळे शेतकरी संकटात

याआधी येवून गेलेला महापूर त्यात मागील दोन वर्षापासून घोंगावणार कोरोनाच संकट आणि आता ऐन उस तोडणीच्या काळात पडणाऱ्या या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने ऊस तोडण्या रखडल्या आहेत.
ऊस तोडणी रखडली, भात काढणी लांबली.. द्राक्षाचे घडही कुजले; अवेळी पावसामुळे शेतकरी संकटात
ऊस तोडणी रखडली, भात काढणी लांबली.. द्राक्षाचे घडही कुजले; अवेळी पावसामुळे शेतकरी संकटातSaamTV
Published On

कोल्हापूर : राज्यातील जवळपास सर्वच भागामध्ये दोन दिवसांपासून पाऊस (Rain) सुरु आहे आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काल रात्रीपासून अवकाळी पावसाने कोल्हापूरसह सागंली जिल्ह्याला (Kolhapur, Sangali District) झोडपून काढलं आहे. मात्र या अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.

हे देखील पहा -

याआधी येवून गेलेला महापूर (Flood) त्यात मागील दोन वर्षापासून घोंगावणार कोरोनाच (Corona) संकट आणि आता ऐन उस तोडणीच्या काळात पडणाऱ्या या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने ऊस तोडण्या रखडल्या आहेत. तर काही ठिकाणी भात काढणी देखील पावसामुळे रखडली आहे आणि आता अशा पावसात भात काढणं देखील अशक्य आहे त्यामुळे भाताचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्ग का हिसकावत आहे असाच प्रश्न बळीराजा विचारत आहे.

ऊस तोडणी रखडली, भात काढणी लांबली.. द्राक्षाचे घडही कुजले; अवेळी पावसामुळे शेतकरी संकटात
Kolhapur : कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

सांगली-पलूस द्राक्ष बागायतदारांना भीती -

दरम्य़ान आज सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे मात्र या पावसामुळे  द्राक्ष (Grapes) बागायतदार हवालदिल झाले आहेत. या पडत असलेल्या पाऊसा मुळे आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षाच्या घड कुजने फुलोरा गळणे असा फटका बसत आहे. तर दावण्या रोगाचा प्रादुर्भावामुळे हाता तोंडाला आलेल्या बागा वाया जाण्याची भीती सांगली-पलूस मधील द्राक्षबागायतदारांना वाटू लागली आहे. या पावसाचा द्राक्षबागासह रब्बी पिकांना फटका बसत आहे. मागील दोन दिवसांपासून ऐन थंडीच्या दिवसात पाऊस सुरु आहे. त्यामुऴे या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com