विसापुर किल्यावरील विजयादशमी ची परंपरा २०१ वर्षानंतरही सुरूच!

ब्रिटिश कर्नल प्रॉथर याने १८१८ साली विसापूर जिंकून या परंपरा खंडित केल्या होत्या.
Visapur Fort News
Visapur Fort Newsदिलीप कांबळे

मावळ : मावळ तालुक्यातील पवनमावळ परिसरातील विसापूर गडावर शिवकाळात एक महान परंपरा सुरू करण्यात आली होती. यात लोहगडवाडीचा पाटील दसऱ्याच्या दिवशी सकाळी विसापूर किल्यावर येऊन नारळ वाढवून उत्सव साजरा केला जात होता.

हे देखील पहा :

ब्रिटिश कर्नल प्रॉथर याने १८१८ साली विसापूर जिंकून या परंपरा खंडित केल्या होत्या. शिव काळात हा उत्सव प्रतिवर्षी होत असे. मात्र, तो उत्सव बजरंग दलाच्या वतीने दसऱ्याच्या दिवशी २०१ वर्षांनंतर म्हणजे गेल्या पाच वर्षा पासुन हा उत्सव सुरु आहे. उद्देश हाच आहे की शिव काळातील बंद पडलेल्या उज्वल परंपरा ज्या स्वता छत्रपर्ती शिवाजी महाराजांनी सुरू केल्या आहेत त्या पुन्हा सुरू व्हाव्यात.

Visapur Fort News
मुदत संपणाऱ्या राजकिय कारभाऱ्यांसह, गृहखात्याला अजित पवारांचे टचके टोमणे..!

त्याचं पार्श्वभूमीवर किल्ले विसापुरवर साबळे पाटलांना बोलावुन त्यांच्या हस्ते आज नारळ वाढवण्यात आला व शस्त्रपूजन ही करण्यात आले. यावेळी शिवकालीन पाटलांचे वंशज गणेश साबळे उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com