मुदत संपणाऱ्या राजकिय कारभाऱ्यांसह, गृहखात्याला अजित पवारांचे टचके टोमणे..!

आंबेगाव पंचायत समितीच्या कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधलेल्या नवीन इमारतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहुर्तावर पार पडलं.
मुदत संपणाऱ्या राजकिय कारभाऱ्यांसह, गृहखात्याला अजित पवारांचे टचके टोमणे..!
मुदत संपणाऱ्या राजकिय कारभाऱ्यांसह, गृहखात्याला अजित पवारांचे टचके टोमणे..! रोहिदास गाडगे

आंबेगाव : राज्यभरतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कारभाऱ्यांची मुदत येत्या डिसेंबर जानेवारीत संपतेय. त्यातच आपल्या काळात झालेल्या विकासाचं श्रेय आपल्याच पदरी पडावं म्हणुन का होईना आपल्या नेत्यांच्या कानी लागुन उद्घाटनांचा घाट घातला जातोय याचं प्रयत्य आलाय खुद्द गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात !

आंबेगाव पंचायत समितीच्या कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधलेल्या नवीन इमारतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहुर्तावर पार पडलं. "नव्याने उभारण्यात आलेल्या पंचायत समितीच्या इमारतीतील फर्निचरचे काम अपुर्ण असतानाही उद्घाटनाचा घात कसा घातला गेला, याचा किस्साच भरसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सांगितला आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडुन फर्निचरसाठी 10 कोटीही पदरी पाडून घेतले.

हे देखील पहा :

व्यासपीठावरुन हा किस्सा सांगताना वळसे पाटील म्हणाले, "पुढील काही दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कारभाऱ्यांनी मुदत संपत आहे. त्यातच काही कारभारी गृहमंत्र्यांच्या कानी लागले आणि आमच्या काळात उभारलेल्या इमारतीच्या फलकावर आमचं नाव लागु द्या असा आग्रह धरल्याने फर्निचर होण्याआधीच घाई करुन उद्घाटन करतोय असं सांगताच सभेच हास्यकल्लोळ झाला.

या विधानावर गप्प राहितील ते अजित पवार कसे! "त्यांनी गृहमंत्र्यांच्या विधानाचा धागा पकडत प्रत्येकजण स्वतःची मुदत संपायच्या आत आपलं नाव लावायची वाटच पहातो.! ते लग्न असो वा राजकिय व्यासपीठ प्रत्येकालाच आपल्या डोळ्यासमोर आपलं नाव लागावं हिच अपेक्षा असते असं म्हणत विद्यमान कारभाऱ्यांना टोमना मारला.!

मुदत संपणाऱ्या राजकिय कारभाऱ्यांसह, गृहखात्याला अजित पवारांचे टचके टोमणे..!
बाबरी मस्जिद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का? - चंद्रकांत पाटील

दरम्यान, राज्यातील गृहमंत्रालयाचा कारभार आणि कारभारी कायमच चर्चेत असतात. त्यामुळे गृहखात्याचा कारभार हाती घेण्यासाठी कुणीही धजावत नसल्याचा, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची नावे घेत भरसभेत जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी गृह खात्याचा कारभार संभाळायलाच नकार दिल्याचा किस्साच सांगितला. जयंत पाटलांचा बीपी वाढतोय तर, छगन भुजबळांनी नकारच दिला आणि हिच जबाबदारी वळसे पाटलांच्या खांद्यावर आली. पण देव करो तुमचा बीपी न वाढो आणि तुम्हाला कुठल्या आजाराचा सामना करायला लागु नये" असं म्हणत गृहमंत्र्याच्या कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दसऱ्याच्या दिवशी शुभेच्छा दिल्या.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com