बाबरी मस्जिद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का? - चंद्रकांत पाटील

शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडल्यानंतर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा खरपूस समाचार घेल्यानंतर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंच्या वाग्बाणांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
बाबरी मस्जिद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का? - चंद्रकांत पाटील
बाबरी मस्जिद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का? - चंद्रकांत पाटीलSaamTvNews

कोल्हापूर : मुंबई मध्ये शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना, विविध मुद्द्यांना हात घातला. त्यांच्या भाषणात त्यांनी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षास लक्ष्य केल्याचे दिसून आले. बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये शिवसेना अग्रभागी होती, आणि सर्व आरोप शिवसेनेने निर्भीडपणे स्वतःवर घेतल्याचे ठाकरे यांनी मेळाव्यास संबोधित करताना म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडल्यानंतर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा खरपूस समाचार घेल्यानंतर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंच्या वाग्बाणांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, शिमगा अजून लांब असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे दसऱ्यालाच उद्धव ठाकरे यांनी शिमगा केला आहे. जेवढा म्हणून भाजपावर शिमगा करता आला तेवढा त्यांनी केला आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. जे दहा हजार कोटी दिल्याची घोषणा केली आहे त्याची फोड करा, त्याचे वाटप कधी होणार आहे? महाराष्ट्रात दोन दोन वादळ येऊन गेली, महिलांवर अत्याचार होतात त्याचे काय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवरती आयात उमेदवारांवरून टीका केली. यावर बोलताना पाटील म्हणाले, 164 जागा लढवल्या त्यापैकी 34 जागा शिवसेना, भाजपाचे उमेदवार घेऊन लढली आहे. जे तुम्ही केलं ते तुम्ही विसरला आहेत.

बाबरी मस्जिद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का? - चंद्रकांत पाटील
शिवसेनेला दिलेलं वचन पाळलं असतं, तर आज मुख्यमंत्री झाला असता : उद्धव ठाकरे

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने आज भाजपाला जोरदार फटकारल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचे हिंदुत्व हे द्वेषाचे नसून, राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आज भाषणात ठाकरेंना भाजपचे हिंदुत्व खूप हिंदुत्व आठवले. बाबरी मस्जिद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का ? राम मंदिर तुम्ही बांधलं का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

भाजपच्या हिंदुत्वावर बोलताना ठाकरे यांनी सहकारी पक्षांना विचारलं आहे का? सत्ता स्थापन करतेवेळी महाराष्ट्र शिवआघाडी असे नामकरण केले होते. मात्र, सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी तेही बदलले. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना औकातीत राहण्याचा इशारा दिला आहे. माझी लायकी आणि आवाका पाहण्यासाठी मोदी आणि शहा समर्थ आहेत, असेही पाटील म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com