कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तमाशाचाच होतोय 'तमाशा'; कलावंत हैराण!

गेल्या दोन वर्षापासुन तमाशा कलांवतांच्या संसाराचा खेळ खंडोबा झालाय. कोरोनामुळे तमाशांच्या फडांना ब्रेक लागला आणि कलावंतांच्या संसाराची राख रांगोळी झाली.
Marathi Tamasha
Marathi TamashaSaamTv
Published On

खेड : ढोलकीवरची थाप, अन् पायातल्या घुंगरांच्या आवाजात लाकडी स्टेजवर सादर होणारी लोककला म्हणजे तमाशा! मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे तमाशा ला पुन्हा ब्रेक लागल्याने कामगार लोककलावतं परतीच्या प्रवासाला लागलेत. गेल्या दोन वर्षापासुन तमाशा (Tamasha) कलांवतांच्या संसाराचा खेळ खंडोबा झालाय. कोरोनामुळे तमाशांच्या फडांना ब्रेक लागला आणि कलावंतांच्या संसाराची राख रांगोळी झाली. यंदाही तमाशावर कोरोनाचं (Corona) सावट उभं राहिल्याने तमाशा कलावंतासह कामगार वर्ग पुन्हा घराकडे निघालाय.

हे देखील पहा :

दोन वर्ष कलावंत सरकारच्या मदतीच्या हाताची अपेक्षा घेऊन बसला असताना अशातच यंदा तमाशाचे फड पुन्हा रंगणार असं ठरलं. राज्य सरकारने घोषणाही केली आणि तमाशा कलावंतांची पावलं तमाशाच्या फडात पडली. लवकर फड रंगणार असं असतानाच पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आणि जत्रा यात्रांसह सांस्कृतिक कार्यक्रमांना ब्रेक लागल्याने पुन्हा तमाशाचा तमाशा होऊन बसला आहे.

हातावरचं पोट घेऊन तमाशा कलावंत गावगावच्या जत्रा यात्रांमध्ये (Yatra) भटकंती करुन तमाशातुन आपली कला सादर करतात व त्यातून त्यांचा उदर निर्वाह चालतो. मात्र, दोन वर्षाच्या ब्रेकनंतर  हि लोककला मोठ्या ताकदीने उभी रहात असतानाच पुन्हा कोरोना संकटामुळे त्याला ब्रेक लागला आहे.

Marathi Tamasha
Beed : बीड जिल्ह्यात दिवसा जमावबंदी; तर रात्री संचारबंदी जारी!

मागील दोन वर्ष फड मालक आणि कलावंत आर्थिक संकटातुन जात असताना, हाताला मिळेत ते काम करुन पोटाचं खळगं भरत होते. यंदा फड पुन्हा उभे राहणार असल्याने फडमालकांना बँकांचे (Bank) आणि सावकारी कर्जाची उभारणी करुन कलावंत जमा केले पैशाचंही वाटप केलं. आता हा तमाशा उभा रहायच्या आधीच पुन्हा पडलाय. आता कर्जाचा डोंगर आणि कलावंताची देखील फरपट तमाशातल्या वगा सारखी झाली आहे.

Marathi Tamasha
परळीत बन्सल क्लासेस चालकांकडून सत्यनारायणाच्या नावाखाली शाही पार्टी!

शेकडो वर्षांची तमाशाची ही लोककला जोपासणाऱ्या कलाकारांच्या कलेचा आता तमाशा होऊन बसल्याचं पाहायला मिळत आहे. आता या कलेला जोपासणा-यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिलाय. त्यातच फड मालकांसह कलावंतांची होणारी फरपट आणि त्यात कोरोनाचं संकट आता जगायचं तरी कसं? असाच नवा वग तमाशात सुरु झालाय. त्यामुळे शासनाने लोककलावंतांना आधार देण्याची गरज आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com