Beed: शिक्षकाने सुरू केला ज्ञानार्जनाचा अनोखा पॅटर्न...

शिक्षकाचे धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत केले कौतुक
Beed News
Beed Newsविनोद जिरे
Published On

बीड - दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या कोरोना रुग्णांमुळं, शाळा-महाविद्यालयात बंद करण्यात आले आहेत. त्यामुळं ऑनलाइन शिक्षण (Online Study) घेण्यासाठी अनेकांकडे मोबाईल नसल्याने, गावखेड्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे, शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. मात्र आपल्या शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी बीड जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने ज्ञानार्जनाचा अनोखा पॅटर्न राबवला आहे.

कोरोना (Corona) नियमांमुळं कासारवाडीची शाळा (School) बंद झाली. त्यामुळं विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अनेकांकडे परस्थिती अभावी ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नव्हता. यामुळं ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होता. हे लक्षात घेऊन, शिक्षक शेखर फुटके यांनी, "शिक्षक आपल्या दारी" असा अनोखा पॅटर्न सुरू केला आहे. शेखर फुटके हे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन, त्यांचा अभ्यास घेतात. यादरम्यान ते विद्यार्थ्यांना गृहपाठ देखील देतात आणि दुसऱ्या दिवशी ते तपासतात. त्यात काही चुका असतील तर त्याला समजावून शिकवतात आणि पुन्हा गृहपाठ देतात. असा त्यांच्या दिनक्रम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.

हे देखील पहा -

याविषयी शेखर फुटके म्हणाले, की मोठ्या लॉकडाऊन नंतर जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी गोडी निर्माण होत होती आणि पुन्हा शाळा बंद झाल्या. मात्र हा निर्णय आमच्यासाठी खूप दुःखदायक होता. आम्हाला एकचं वाटायचं, की किमान ग्रामीण भागातील तरी शाळा सुरू ठेवाव्यात.

विद्यार्थ्यांसाठी सतत आम्ही नवनवीन प्रयत्न करत असतो. शाळेत नवनवीन नाटिका, गाणी बसवत असतो. ते मी यू टब्यू चॅनलवर टाकतो. त्यामधून मला जवळपास दीड लाख रुपये मिळाले. मी त्यापैकी एक लाख रुपये शाळेला दिले. असंही चंद्रशेखर फुटके म्हणाले.

तर याविषयी विद्यार्थी आकाश गुट्टे म्हणाला, की सर गावात येऊन आमचा अभ्यास घेत आहेत. प्रत्येकाचा गट करून गृहपाठ तपासतात, मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना मदत करतात. यामुळं सर्वांची प्रगती होत आहे. असं आकाश गुट्टे म्हणाला.

तर याविषयी पालक जगनाथ गुट्टे म्हणाले, की आमच्या गावात फुटके सर येऊन मुलांचा अभ्यास घेत आहेत. प्रत्येक मुलांच्या घरी जाऊन ते अभ्यास घेत आहेत. त्यामुळं मुलांची चांगली प्रगती होत आहे.

तर याविषयी महिला पालक रोहिणी गुट्टे म्हणल्या, की कोरोनामुळं शाळा बंद झाल्या, मात्र फुटके सर घरोघरी येऊन मुलांचा अभ्यास घेतात, त्यांना गृहपाठ देतात आणि त्याची तपासणी करतात. यामुळं आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होत नाही. असं रोहिणी गुट्टे म्हणाल्या.

Beed News
Madhya Pradesh: नशेत मोबाईल टॉवरवर चढला तळीराम; पोलिस येताच...

धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत केले कौतुक

तर याची दखल खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली असून फेसबुक पोस्ट करत फुटके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. फेसबुक पोस्टद्वारे म्हटलंय की, "आमच्या परळी मतदारसंघातील कासारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शेखर फुटके हे शाळा बंद असल्या तरी नियमितपणे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना गृहपाठ देतात व दुसऱ्या दिवशी जाऊन तो गृहपाठ व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आढावा घेतात.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे शिक्षक इतक्या प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने काम करतात ही निश्चीतच इतरांसाठी प्रेरणादायी बाब आहे. असे शिक्षक नक्कीच आमच्या समाजासाठी आदर्श आहेत. फुटके सर, आम्हाला आपला अभिमान आहे." अशा शब्दात शिक्षक फुटके यांचे मंत्री धनंजय मुंडेंनी कौतुक केले आहे.

दरम्यान गाव खेड्यातील विद्यार्थ्यांना मोबाईल आणि रेंज नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून दूर राहावे लागत आहे. अनेकांची परिस्थिती हलाखीची असल्याने मोबाईल घेऊ शकत नाहीत, यामुळे या कासारवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, चंद्रशेखर फुटके यांनी सुरु केलेला "ज्ञानार्जनाचा अनोखा पॅटर्न" राज्यातील शिक्षकांपुढे प्रेरणा देणारा ठरत आहे. त्यामुळे इतर शिक्षकांनी देखील शिक्षक चंद्रशेखर फुटके यांचा आदर्श घ्यावा. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com