अमित देशमुख । किरीट सोमय्या
अमित देशमुख । किरीट सोमय्या SaamTvNews

अमित देशमुख यांच्या परिवारातील साखर कारखान्यांचे घोटाळे लवकरच बाहेर काढणार

भाजप नेते किरीट सोमय्या आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या परिवारातील साखर कारखान्यांचे घोटाळे लवकरच बाहेर काढण्याचा इशारा दिला.
Published on

लातुर : भाजप नेते किरीट सोमय्या आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या परिवारातील साखर कारखान्यांचे घोटाळे लवकरच बाहेर काढण्याचा इशारा दिला.

हे देखील पहा :

जिल्ह्यातील अहमदपूर येथील सिद्धी, उदगीर येथील प्रियदर्शिनी साखर कारखान्याची चौकशी ही सुरु केली असून इतरही साखर कारखान्याबाबत ईडीकडे कागदपत्रे देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील ४० घोटाळे बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अमित देशमुख । किरीट सोमय्या
बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

दरम्यान, नवाब मलिक यांचे समीर वानखेडे यांच्यावरील आरोप हे अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराचे लक्ष विचलित करण्यासाठी सुरु असल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला. संजय राऊत यांनी मला पाठविलेल्या पत्राला उद्धव ठाकरे यांनी दमडीचेही महत्व दिले नसून त्यांचे पत्रावर फक्त सीआयडी चौकशी होऊ शकते असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com