जिलेटिन स्फोट करून मासेमारी होत असल्याने मुळा धरणाची सुरक्षा धोक्यात

अहमदनगर दक्षिण जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या मुळा धरणात मच्छीमारांकडून मासेमारीसाठी करण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या स्फोटामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
जिलेटिन स्फोट करून मासेमारी होत असल्याने मुळा धरणाची सुरक्षा धोक्यात
जिलेटिन स्फोट करून मासेमारी होत असल्याने मुळा धरणाची सुरक्षा धोक्यातSaam Tv News
Published On

अहमदनगर - दक्षिण जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या मुळा धरणात मच्छीमारांकडून मासेमारीसाठी करण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या स्फोटामुळे gelatin blast धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. security of mula dam is in danger मुळा पाटबंधारे विभागाच्या Department of Irrigation समोर हा प्रकार होत असूनही अद्याप प्रशासनाने यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. धरण परिसरात अनाधिकृतपणे झोपड्या बांधल्या असून जिलेटिन स्फोट करणारे या झोपड्यात राहतात, तरीही पाटबंधारे विभाग गप्प असल्याचं पाहायला मिळत आहे. the security of mula dam is in danger because of gelatin blast for fishing

हे देखील पहा -

मुळा धरणामध्ये कमी वेळात जास्त मासे मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून जिलेटिनचा स्फोट करून मच्छीमारी केली जात आहे. त्यामुळे धरणातील पाणी विषारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी जिलेटिनचा स्फोट केला जातो त्याने हजारो मासे मृत्युमुखी पडतात त्यामुळे मुळा धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. मुळा धरणाच्या 52 किलो मीटरच्या परिसरामध्ये संरक्षणाची गरज आहे. पूर्वी मुळा धरणावर 150 कर्मचारी तैनात होते पण त्यातील काही कर्मचारी निवृत्त झाल्याने सध्या कर्मचाऱ्यांची संख्या 14 वर येऊन ठेपली आहे. धरणामध्ये स्फोट कोण करतं मच्छिमार की आणखी कोणी, याबाबत मुळा पाटबंधारे विभागाकडे कोणतीही माहिती नाही. मात्र स्फोट होतो हे तेही मान्य करतात. वर्षानुवर्ष स्फोट करणारे सापडत कसे नाही हाच प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By - Akshay Basiane

जिलेटिन स्फोट करून मासेमारी होत असल्याने मुळा धरणाची सुरक्षा धोक्यात
विठ्ठल - रुक्‍मिणीच्या महापूजेचा मान वर्ध्यातील दाम्पत्यास

मुळा धरणावर सध्या 14 कर्मचारी कार्यरत आहे. मुळा धरणाचा परिसर 52 किलो मीटरचा आहे. या इतक्या मोठ्या मुळा धरणाच्या एरियासाठी फक्त 14 कर्मचारी कार्यरत आहेत, त्यामुळे थोड्या कर्मचाऱ्यांत काम करणं जिगरीच होऊन गेलं आहे. मुळा धरणाचा मच्छीमारीचा व्यवसाय हा शासनाने मच्छ विभागाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे सगळी जबाबदारी ही मच्छ विभागाची असल्याचे मुळा धरणाचे शाखाभियंते अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com