Beed : भंडारा दुर्घटनेची पुनरावृती टळली; नर्समुळे वाचले 12 नवजात बालकांचे प्राण!

बीड जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयु वार्डात, वॉर्मरच्या शॉकेटमधून धूर निघाला, इतक्यात नर्सने सतर्कता दाखवली अन 12 नवजात बालकाचे प्राण वाचले.
Beed : भंडारा दुर्घटनेची पुनरावृती टळली; नर्समुळे वाचले 12 नवजात बालकांचे प्राण!
Beed : भंडारा दुर्घटनेची पुनरावृती टळली; नर्समुळे वाचले 12 नवजात बालकांचे प्राण!विनोद जिरे
Published On

बीड : बीड जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयु वार्डात, वॉर्मरच्या शॉकेटमधून धूर निघाला, इतक्यात नर्सने सतर्कता दाखवली अन 12 नवजात बालकाचे प्राण वाचले. बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अंगावर काटा आणणारी घटना सुदैवाने टळलीय. बीड जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयु विभागातील पहिल्या क्रमांकाच्या वॉर्मरमध्ये शॉर्टसर्किटने जळाल्याचा वास येऊ लागला. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या अनिता मुंडे व पुष्पा माने या दोघी नर्सने धावाधाव केली. धूर निघणारा वॉर्मर व इतर सर्व 13 वॉर्मरचा वीज पुरवठा खंडित केला. वॉर्मरमधील बालकांना इतरत्र हलवले, हा प्रकार बुधवारी सायंकाळच्या दरम्यान घडला. आणि नर्सेसच्या सतर्कतेमुळे बीडचे भंडारा होता होता वाचले.

हे देखील पहा :

जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयु वार्डातील एका वॉर्मरमधून धूर निघत असल्याचे दिसताच नर्स अनिता मुंडे यांनी पुष्पा माने यांना जोरात आवाज दिला. मी बाळाला उचलते तू लवकर लाईट बंद कर, माने यांनी कसलीही परवा न करता सर्वच वीजपुरवठा क्षणात बंद केला. तर मुंडे यांनी इतर बालकांना सुरक्षित केले. तसेच दोघींनी वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती दिली. वॉर्मरला गरम होण्यासाठी वरच्या बाजूला मधोमध कॉइन असतो. त्याला अचानक वीज कमी जास्त झाल्याने, कॉइन गरम झाला. त्यात जाळ लागला असता तर स्फोट झाला असता. त्यातच एसएनसीयु विभागात एसी आणि ऑक्सिजन पुरवठा, लाईट असल्याने मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, सुदैवाने नर्सच्या समयसूचकतेमुळे दुर्घटना टळली.

याविषयी नर्स अनिता मुंडे म्हणाल्या, की मी लहान मुलांना दूध फीड करत असताना, अचानक वायर जळल्यासारखा वास आला. इकडे तिकडे पाहिले असता, एक नंबरच्या वॉर्मर मधून धूर निघत होता. त्यावेळी लगेच मी माने सिस्टरला आवाज दिला. मी मुलांना उचलते, तुम्ही वॉर्मर बंद करा. असे सांगितले. त्यावेळी सर्वच वॉर्मरच्या पिना काढल्या. तसेच डॉ. इलियास सरांना बोलावलं. इतर वॉर्मर पासून दुसरे वॉर्मर दूर केले, त्यामुळे अनर्थ टळला. असे अनिता मुंडे यांनी सांगितले.

Beed : भंडारा दुर्घटनेची पुनरावृती टळली; नर्समुळे वाचले 12 नवजात बालकांचे प्राण!
Raigad : चोरी गेलेला 60 लाखांचा मुद्देमाल जिल्हा पोलिसांनी दिला मिळवून!

डॉ.इलियास सरांचा राऊंड झाल्यानंतर मी आणि अनिता बाळाला दूध पाजत होतो. त्यावेळी वास आल्याने काहीतरी जळत आहे. असं त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी मला हाक देऊन वॉर्मर बंद कर मी मुलांना उचलून घेते असे म्हणत आवाज दिला. त्यावेळी खूप धावपळ झाली, लगेच इलेक्ट्रिशन आणि बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं. दहा-पंधरा जण जमा होत आले होते. मात्र विद्युत कनेक्शन कट केले नसते, तर मोठा अनर्थ झाला असता. असे नर्स पुष्पा माने यांनी सांगितले.

एसएनसीयु वार्डाच्या समोर आम्ही पालकांची कौन्सिलिंग करत होतो. त्यावेळी पुष्पा माने सिस्टरचा आवाज आल्याने आम्ही मध्ये गेलो. त्यावेळेस 1 नंबरच्या वॉर्मरमधून धूर निघत होता. माने सिस्टर आणि मुंडे सिस्टर यांनी समय सूचकता दाखवत विद्युत पुरवठा खंडित केला. नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून बोलून घेतले. मात्र सतर्कतेमुळे होणारा अनर्थ टळला. असे एसएनसीयु विभागाचे प्रमुख डॉ.इलियास खान यांनी सांगितले.

Beed : भंडारा दुर्घटनेची पुनरावृती टळली; नर्समुळे वाचले 12 नवजात बालकांचे प्राण!
ब्रेकऐवजी ऍक्सीलेटर दाबला; चारचाकी विहिरीत पडून महिलेचा मृत्यू!

एसएनसीयु विभागात पहिल्या वॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यावेळी कर्मचारी सतर्क होते म्हणून दुर्घटना टळली. भंडारा आणि अहमदनगरच्या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी व डॉक्टरांचे फायर संदर्भातील प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे समयसूचकता दाखवत मुंडे आणि माने नर्स यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी सांगितलं. तसेच दोन्ही नर्सला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान, बीड जिल्ह्यातील होणारी मोठी दुर्घटना कर्तव्यावर असणाऱ्या नर्सच्या सतर्कतेने टळली. अन्यथा बीड जिल्हा रुग्णालयात देखील, भंडारा- अहमदनगर सारखी घटना घडली असते. मात्र, नर्सच्या सतर्कतेने अन दैव बलवत्तर म्हणून या चिमुकल्यांचा जीव वाचला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com