बोरी उमरगे पुलावर पाणी तर शिरवळवाडी सांडव्याचा भराव गेला वाहून!

धरणाचे तीन दरवाजे उघडून 1800 क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
बोरी उमरगे पुलावर पाणी तर शिरवळवाडी सांडव्याचा भरावही गेला वाहून!
बोरी उमरगे पुलावर पाणी तर शिरवळवाडी सांडव्याचा भरावही गेला वाहून!विश्वभूषण लिमये
Published On

सोलापूर : अक्कलकोट (Akkalkot) तालुक्‍यातील कुरनूर धरण (Kurnoor Dam) मागच्या तीन दिवसांच्या जोरदार पावसामुळे (Heavy Rain) पुन्हा ओसंडून वाहू लागले आहे. आज पहाटे धरणाचे तीन दरवाजे उघडून 1800 क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. (The Kurnoor Dam has started overflowing again due to heavy rains)

हे देखील पहा -

तसेच शिरवळवाडी तलाव तुडुंब भरून मोठ्या प्रमाणावर सांडव्यातून पाणी वाहत असून सांडव्याच्या जवळचे सर्व भराव पाण्याने वाहून गेल्याने गावकऱ्यांना तलावाच्या पलीकडे असणाऱ्या शेतीत जाणे अडचणीचे ठरत आहे. गावातील नागरिकांना तलावाच्या पलीकडील शेतीत जाण्यासाठी सांडव्याच्या वरूनच जावे लागते. मात्र सध्या तिथे प्रचंड पाणी असल्याने पलीकडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे.

बोरी उमरगे पुलावर पाणी तर शिरवळवाडी सांडव्याचा भरावही गेला वाहून!
Bigg Boss Marathi 3: कीर्तनकार शिवलीला पाटील का होतेय ट्रोल?

त्यासाठी या ठिकाणी छोटासा पूल सांडव्याचे पाणी जाण्यासाठी बांधून द्यावा, अशी अनेक दिवसांपासूनची असणाऱी गावकऱ्यांची मागणी अद्याप पूर्ण होताना दिसत नाही. मागील दीड महिन्यापूर्वी तलावा शेजारील अडचणीची ठरणारी झाडे,काटेकुटे तोडण्यात आली आहेत, मात्र,ती उचलून बाहेर फेकणे किंवा विल्हेवाट लावणे गरजेचे असताना तिथेच टाकून दिल्याने पाणी जायला वाट मिळेनासे झाले आहे. प्रशासनास वारंवार विनंती करूनही काम करून दिले जात नसल्याने प्रशासनाच्या कामकाजावर गावकरी नाराज असल्याच चित्र पहायला मिळत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com