पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

पालघर जिल्ह्यात सर्वाधिक विक्रमगडमध्ये 130 मिमी तर, तालवाडा येथे 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंदरुपेश पाटील

पालघर - विक्रमगड vikramgad येथील शेवते (भंडागे पाडा) तांबाडी नदीला आलेल्या पुरामुळे flood नदीने रौद्ररूप धरण केले असून अनेक घरात पुराचे पाणी गेले आहे. तालुक्यातील अनेक गावात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक असा विक्रमगडमध्ये 130 मिमी तर तालवाडा येथे 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. The highest rainfall was recorded in Vikramgad taluka of Palghar district

हे देखील पहा -

तांबाडी नदी, ब्राह्मणगाव पुल, नागझरी बंधारा, मान फरशी, ओंदे पुल, आंबेघर पुल, खांड, मुँहू खुर्द लघुपाटबंधारे ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे जव्हार - वाडा, विक्रमगड - वाडा, पालघर - विक्रमगड, जव्हार - विक्रमगड, विक्रमगड - डहाणु या मार्गावरील वाहतूक बंद पडली होती, त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. तर या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांचे भातपीक पाण्याखाली असल्याने ते कुजण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आदिवासी भागातील सर्वच तालुक्यातील भात शेतीचे व भाज्यांचे तसेच पुराचे पाणी सर्वसामान्यांच्या घरात शिरल्याने नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाकडून नदी, नाले किनारी वसलेल्या गावांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com