शिंदे-फडणवीस सरकारच मोठं गिफ्ट; समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच लोकार्पण दिवाळीतच

नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार समृद्धीच्या पहिल्या टप्प्याच लोकार्पण.
Samriddhi Highway
Samriddhi HighwaySaam TV
Published On

Samruddhi Highway : नागपूर - मुंबई असा ७०१ किलोमीटरचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच लोकार्पण दिवाळीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालं आहे. (Samruddhi Highway Latest Update)

Samriddhi Highway
Science News : संशोधनातून सिद्ध ! गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीचा आकार बदलला; ती आता गोल दिसणार नाही...

दिवाळीच्या मुहूर्तावर नागपूर (Nagpur) ते मेहेकर या 300 किमी अंतराचे पहिल्या टप्प्यात लोकार्पण होण्याची शक्यता आहे. पुढील शिर्डी पर्यंत मार्ग हा एकतर्फी राहणार आहे अजून पर्यंत पूर्ण काम झालेले नसल्याने मेहेकर ते शिर्डी एकतर्फी मार्ग सुरु ठेवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आल्याच सांगितलं आहे.

समृद्धी महामार्गाची अनेकदा लोकार्पणाची तारीख जाहीर होऊनही लोकार्पण होऊ न शकल्यामुळे यावेळी सरकारकडून या तारखेबद्दल गोपनीयता पाळण्यात येत आहे. पंतप्रधानांनी वेळ दिल्यावरच मुख्यमंत्री कार्यालयाकडून तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मात्र येत्या दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे येत्या २३ ऑक्टोबर रोजी हा लोकार्पण सोहळा नागपुरात होऊ शकतो अशी खात्रीलायक माहिती आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून वेळ आणि तारीख मिळाल्यानंतरच मात्र लोकार्पण होणार हे नक्की आहे. मात्र पाऊस आणि अन्य कारणांमुळे लोकार्पण पुढे ही ढकलल्या जाऊ शकत असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

वाहनांनुसार कशी असेल वेगमर्यादा?

>> 8 प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनाला 120 किमी/तास वेगमर्यादा.

>> 9 पेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनाला 100 किमी/तास वेगमर्यादा.

>> सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला 80 किमी/तासांची वेगमर्यादा.

>> समृद्धी महामार्गावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी रिक्षाला परवानगी नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com