नोकरी देण्याच्या बहाण्याने इंजिनिअर वरती हल्ला; उपचारा दरम्यान मृत्यू!

नोकरी देण्याच्या निमित्ताने डोंबिवली मध्ये बोलवून घेऊन लुटण्याचा प्रयत्न केला.
नोकरी देण्याच्या बहाण्याने इंजिनिअर वरती हल्ला; उपचारा दरम्यान मृत्यू!
नोकरी देण्याच्या बहाण्याने इंजिनिअर वरती हल्ला; उपचारा दरम्यान मृत्यू!प्रदीप भणगे
Published On

डोंबिवली : डोंबिवली (Dombivli) पूर्वेतील टाटा पॉवर जवळ कृष्णा तिवारी या व्यक्तीवर धारधार हत्याराने वार केल्याची घटना शनिवारी घडली होती. वाहतूक पोलिसांना ही घटना निदर्शनास येताच त्यांनी जखमी इंजिनिअरला (Engineer) डोंबिवलीतील शिवम हॉस्पिटल (Shivam Hospital) मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र कृष्णा यांच्या हातावर व डोक्यावर जबर मारहाण झाल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे मानपाडा पोलिसांकडून ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(The engineer died during treatment)

हे देखील पहा-

आरोपींनी कृष्णा तिवारी याला नोकरी देण्याच्या निमित्ताने डोंबिवली मध्ये बोलवून घेऊन लुटण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने प्रतिकार केला असता आरोपीने लोखंडी हत्याराने मारहाण करून जबर जखमी करून खंबालपाडा याठिकाणी फेकून दिले. ही घटना वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी पीडीत युवकास डोंबिवलीतील शिवम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान कृष्णा यांचा मृत्य झाला. कोणताही पुरावा नसताना मानपाडा पोलिसांनी तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन ४ पैकी 3 आरोपीना अटक केली आहे.

नोकरी देण्याच्या बहाण्याने इंजिनिअर वरती हल्ला; उपचारा दरम्यान मृत्यू!
Breaking News: OBC आरक्षणा संदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

रिहान शेख, सागर पोनाला आणि सुमित सोनवणे असे आरोपींचे नाव आहेत. यांच्यामध्ये एक अल्पवयीन आरोपी असल्याने त्याला बाल सुधार गृहात पाठण्यात आले आहे. सदर गुन्हा डीसीपी विवेक पानसरे (DCP Vivek pansare) आणि एसीपी जयराम मोरे (ACP Jayaram More) यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, अविनाश वनवे, अनिल भिसे आणि पथकाने उघडकीस आणला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com