ज्या दिवशी माझ्याकडून बीड जिल्ह्याची बदनामी होईल, तो माझा शेवटचा क्षण असेल - पंकजा मुंडे

बीड जिल्ह्याच्या बदनामी वरून मुंडे बहीण-भावात संघर्ष...
पंकजा मुंडे | धनंजय मुंडे
पंकजा मुंडे | धनंजय मुंडे SaamTvNews

बीड : ज्या दिवशी माझ्याकडून बीड जिल्ह्याची बदनामी होईल, त्या दिवशी माझा शेवटचा श्वास असेल. स्वर्गातही लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची मान खाली होईल. अशा पद्धतीने कधीही वागणार नाही. असं म्हणत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले. बीड (Beed) जिल्ह्यातील धारूर येथील शेतकरी मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मी कधी कोणाकडून पैसे खाल्ले नाही, कधी कुणाचा चहा पिले नाही, कधी कोणावर खोट्या कारवाया केल्या नाहीत, बदनामी करण्यासारखं कोणत काम मी केलं नाही. ज्या दिवशी माझ्याकडून बदनामी सारख काम होईल, त्या दिवशी शेवटचा श्वास असेल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना उत्तर दिले.

हे देखील पहा :

बीड जिल्ह्याच्या बदनामी वरून आता मुंडे बंधू-भगिनी मध्ये चांगलाच वाद रंगला आहे. बीड जिल्ह्यातील वाळू माफिया, गुटखा माफिया वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार अधिकाऱ्यांना होणारी मुस्कटदाबी यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी थेट गृहमंत्री यांना पत्र पाठवले होते. तसेच सत्ताधारी पक्षातील दोन आमदारांनी देखील अधिवेशनामध्ये बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडली होती. यावर बोलताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, की कृपा करून माझ्याकडून काही चुकत असेल तर हात जोडून विनंती करतोय. वैयक्तिक माझ्यावरती टीका करा मात्र जिल्ह्याची बदनामी करू नका, असे म्हणत सत्ताधारी पक्षातील आमदार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विनंती केली होती.

पंकजा मुंडे | धनंजय मुंडे
डोंबिवलीत शिवजयंतीवरून भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध!

तसेच भाजपच्या (BJP) काळातच जिल्ह्याची मोठी बदनामी झाली. असं देखील धनंजय मुंडे म्हणाले होते. यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी आज चांगलाच समाचार घेतला. ग्रामविकास मंत्री असताना पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरकारी दवाखाने, रस्ते सर्व ठिकाणी भरघोस निधी दिला. आज त्याचे लोकार्पण आणि उद्घाटने सुरु आहेत. त्यांनी गेल्या तीन वर्षात एक तरी विकास काम आणले का? आता परळीच्या जनतेला वीट आला आहे. चुकून झालेला विजय महागात पडणार, असे म्हणत धनंजय मुंडेंवर पंकजा यांनी निशाणा साधला.

पंकजा मुंडे | धनंजय मुंडे
धक्कादायक! नऱ्ह्यात १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार

पुढे बोलताना पंकजा म्हणाल्या, परळीत माझे फार्महाऊस नाही, परळीत माझा महाल नाही. आता जनतेला मी मी म्हणणार नेता नकोय, आता जनता जनता म्हणणारा नेता हवा आहे. तसेच काही जणांच्या अहंकाराला जनता कंटाळली आहे असा टोलाही नाव न घेता धनंजय मुंडेंना लागलेला. आपलं सरकार येईल, सर्व जण मिळून आता कामाला लागा, म्हणत पंकजा मुंडे यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मूठ बांधायला सुरुवात केलीय. जिल्ह्याच्या बदनामी वरून बीड जिल्ह्यातील (Beed District) राजकारण चांगलेच तापले आहे. याच राजकारणात मुंडे बहिण भाऊ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा बदनामीचा मुद्दा गाजणार आहे. जिल्ह्याचे नाव कोणी केले आणि बदनाम कोणी केले? हा खरा प्रश्न आता जनतेला पडला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com