घोडचे पाणी अडचणीतून काढणार मार्ग

कालवा
कालवा
Published On

अहमदनगर : घोडच्या लाभक्षेत्रात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कुकडीचे येडगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने कुकडीचे आवर्तन सुरु आहे. आता घोड धरण ३३ टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने व पाण्याची गरज असल्याने आवर्तनाची मागणी होत आहे.

दरम्यान काष्टी ते श्रीगोंदे दरम्यान सुरु असणाऱ्या रस्त्याच्या कामातील पुलामुळे घोडचा कालवा बुजविल्याने अडचणीत भर आहे. तथापि यात मार्ग काढून जलसंपदा विभाग घोडचे पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशिल असल्याने दिलासा मिळाला आहे.The cycle of the Ghod canal will begin

कालवा
तीर्थकुंड हडपणाऱ्या भाजपनेत्याला सेनेच्या मंत्र्यांचा आधार!

घोड धरणात नियमानूसार ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा हवा आहे. सध्या ३२ टक्के साठा असून त्यात वाढ होत आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाऊस नसल्याने पाण्याची मागणी होत आहे. पावसाने दडी मारली असतानाच जोराचा वारा आणि ढगाळ वातावरणामुळे जमिनीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज वाढली आहे. या सगळ्या चिंतेत न्हावरा ते बीड या रस्त्याचे काम सुरु असून काष्टी ते श्रीगोंदे दरम्यान काम सुरु आहे.

घोडचा कालवा हा रस्ता ओलांडून पुढे जातो. तेथे नवीन पुलाचे काम सुरु असल्याने कालवा बुडविण्यात आला आहे. शिवाय काही महिने ते काम चालणार असल्याचे सांगण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांच्या संकटात भरच पडली आहे.

याबाबत कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांना विचारले असला, घोडमध्ये उपलब्ध पाण्यानुसार वरिष्ठ कार्यालयात आवर्तन सोडण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्याची लवकरच मंजूरी मिळेल. त्यामुळे येत्या सहा ते सात दिवसात आवर्तन सोडले जाईल. The cycle of the Ghod canal will begin

पुलाचे काम सुरू असल्याने कालवा बुजला असला तरी त्यात मार्ग काढला जाईल. गरज पडल्यास वरच्या भागातून आवर्तन सुरू अन्यथा ठेकेदाराकडून तात्पुरती दुरुस्ती करुन आवर्तन सुरळीत करू मात्र त्यामुळे आवर्तन रखडणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com