Sharad Pawar - Ambadas Danve : शरद पवारांच्या फुटीबाबतच्या वक्तव्यानं राजकीय फटाके; ठाकरे गटाचा नाराजीचा भडका

Maharashtra Politics: कुणी सोबत आलं तर ठीक नाहीतर स्वबळावर सर्व जागांवर लढण्याची आमची तयारी आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.
Sharad Pawar, Supriya Sule, Ajit Pawar maharashtra Political News in Marathi
Sharad Pawar, Supriya Sule, Ajit Pawar maharashtra Political News in MarathiSaam TV
Published On

Maharashtra Political Crisis : अजित पवार आमचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडली नाही, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे या दोन्ही नेत्यांनी केलं होतं. पण या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे बोलले जाते. शरद पवारांच्या विधानाचे परिणाम होत आहेत, असं सांगतानाच, कुणी सोबत आलं तर ठीक नाहीतर स्वबळावर सर्व जागांवर लढण्याची आमची तयारी आहे, असं ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. (Latest Marathi News)

अजित पवार यांनी भाजपला साथ दिली. सत्तेत सहभागी झाले. उपमुख्यमंत्रिपदीही विराजमान झाले. यानंतर राष्ट्रवादी फुटल्याचे बोलले जात होते. मात्र, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी ही फूट नसल्याचे वक्तव्य केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये नाराजी आहे, अशी चर्चा आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनीही छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना नाराजी व्यक्त केली आहे.

Sharad Pawar, Supriya Sule, Ajit Pawar maharashtra Political News in Marathi
Ajit Pawar: "पुन्हा परिवर्तन होऊ शकतं" अजित पवारांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय?

काय म्हणाले अंबादास दानवे?

पक्ष आणि चिन्ह वाचवण्यासाठी शरद पवारांनी असे वक्तव्य केले असावे. मात्र यातून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय हे सत्य आहे. संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य सातत्याने केले जात आहे. मात्र महाविकास आघाडीवर याचा काहीही फरक पडणार नाही. भाजपसोबत सत्तेत गेलेले त्यांचे नेते असतील, तर संभ्रम आहेच हे स्पष्ट आहे, असे दानवे म्हणाले.

आमच्याही पक्षात या अशा विधानामुळे गोंधळ होतो हे सत्य आहे. अशी भूमिका वारंवार मांडली जात असेल तर आम्ही समजावे काय? सर्व जागांवर तयारी असावी ही सर्व पक्षांची भूमिका असते. आमचीही आहे. राज्यातील सर्व जागांचा आढावा घेतोय आणि घेणार आहोत. 'इंडिया' बैठकीआधी विधानाचा फार परिणाम होईल असा भाग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar, Supriya Sule, Ajit Pawar maharashtra Political News in Marathi
Chandrashekhar Bawankule: "चांद्रयान मोहिमेबद्दल आनंद साजरा होत असताना उद्धव ठाकरेंना पोटदुखी"; सामनाच्या अग्रलेखावर बावनकुळेंचं चोख प्रत्युत्तर

पक्ष प्रमुखांनी याबाबत भूमिका अजून सांगितली नाही. त्यांनी ताबडतोब व्यक्त व्हावे असेही नाही. मात्र आम्ही भूमिका मांडतो. चर्चा आणि संभ्रम निर्माण होईल यात शंका नाही. फसवणूक नाही, मात्र राष्ट्रवादीसंदर्भातील भूमिका शिवसैनिक सातत्याने वरिष्ठांकडे मांडतोय. थेट राष्ट्रवादीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांच्या विधानाचे परिणाम होत आहेत, अशी भूमिका दानवेंनी स्पष्टपणे मांडली.

आमच्या आमदारांच्या कामांना स्थगिती मिळाली आहे. मात्र आम्ही सरकारच्या दारात जात नाही. NCP च्या सर्व आमदारांना अजित पवार यांनी निधी दिला आहे, असा दावाही त्यांनी केला. कुणी आलं तर ठीक नाहीतर, स्वबळावरही सर्व जागांवर आमची तयारी आहे. चाचपणी सुरू आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

अजित पवार, एकनाथ शिंदेंचेही असेच हाल होतील - दानवे

इंडियाचा धसका आता पंतप्रधानांनी घेतला आहे. अनेक ठिकाणी भाजप नामोहरम झाली आहे, असा टोलाही दानवेंनी लगावला.

भाजपसोबत जाणाऱ्यांचे हाल होतात. ज्योतिरादित्य शिंदेंकडे बघा. हेच हाल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचेही होतील, असं भाकितही त्यांनी व्यक्त केलं.

दुष्काळाची स्थिती आहे. सरकार गंभीर नाही. शेखी मिरवत आहे. बुलेट ट्रेन बोलतात, चंद्रावरून यांचे यान अजून खाली आलेले नाही. येणाऱ्या काळात दुष्काळ जाहीर करावा लागेल, तशी आमचीही मागणी आहे, असंही दानवे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com