नागपूर: मुंबई महापालिकेप्रमाणे नागपुरातही 500 वर्ग फुटाच्या करमाफीचा ठराव नागपूर महानगरपालिकेने पारित केलाय. करआकारणी आणि करसंकलन समितीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आलाय (Tax Exemption For 500 Square Feet Houses In Nagpur By Municipal Corporation).
यामुळे नागपुरातील (Nagpur) अडीच लाख लोकांना फायदा होणार आहे. मात्र, नागपूर मनपा आयुक्तांनी याला अद्याप मंजुरी दिलेली नाही. आता राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवण्याची शक्यता आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) संपूर्ण राज्याचे आहेत, फक्त मुंबईचे नाहीत. मात्र, कॅबिनेटमध्ये फक्त मुंबईत (Mumbai) 500 चौरस फुटांच्या करमाफीचा (Tax Exemption) निर्णय घेण्यात आलाय. नागपूर बाबतही हा निर्णय घ्यावा आणि नागपुरातील अडीच लाख लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागपूर मनपाचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी केलीये. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तापक्ष असलेल्या भाजपनं हा निर्णय घेतल्याने यामागे राजकीय लाभ घेण्याचा भाजपचा मनसुबा आहे, अशी टीका अविनाश ठाकरे यांनी केली आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.