
CBSE साउथ झोन - II चॅम्पियनशिपमध्ये स्वराजचा पराक्रम
U-14 Boys गटात 7 पैकी 7 गुण मिळवत संयुक्त विजेतेपद
Sicilian Defence रणनीती वापरत आकर्षक विजय
पोदार इंटरनॅशनल शाळा, पालक व मार्गदर्शकांचे कौतुक
कर्नाटकमधील दावणगेरे येथे नुकत्याच झालेल्या CBSE साउथ झोन - II चॅम्पियनशिप 2025-26 स्पर्धेमध्ये संभाजीनगरच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी स्वराज मनोज विश्वासे याने विजय मिळवला. U-14 Boys गटात स्वराजने दमदार कामगिरी करत संयुक्त विजेतेपद पटकावले. स्वराजने 7 पैकी 7 गुण मिळवले, परंतु संघाच्या गुणांनुसार त्याला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
A टेबलवर खेळताना स्वराजने S. Lalit, Advik Rawath, Chetas Naik, An Athazar, Deono, Kartik Soddagi आणि Swapni RG यांना पराभूत करत आपली कौशल्यपूर्ण खेळी दाखवली. Advik Rawath यांच्याविरुद्ध Sicilian Defence रणनीती वापरत स्वराजने Rook आणि Bishop यांचा त्याग करून आकर्षक विजय नोंदवला. दरम्यान, औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, WIM तेजस्विनी सागर, विकास पालांडे, अॅड. उमेश जहागीरदार, मिथुन वाघमारे यांच्यासह अनेकांनी स्वराजवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
स्वराजसोबत त्याचे वडील मनोज विश्वासे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य रविंद्र राणा, क्रीडा शिक्षक दीपक सुरडकर आणि राहुल तांदळे यांनी स्वराजचे कौतुक केले. स्वराजचे प्रशिक्षण अंजली सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.