Crop Insurance: वाशिममध्ये पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना स्वाभिमानीकडून मारहाण

वाशिम जिल्ह्यात पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीये
Crop Insurance
Crop InsuranceSaam Tv
Published On

वाशिम: वाशिम जिल्ह्यात पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीये. स्वाभिमानीचे विदर्भ प्रमुख दामू इंगोले यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली (Swabhimani Shetkari Sanghatana activist beats up crop insurance company officials in Washim).

Crop Insurance
वाशिम जिल्हा परिषदे मध्ये महाविकास आघाडी पास!

नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांना रिलायन्स पीक विमा कंपनी नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे (Swabhimani Shetkari Sanghatana) आल्या होत्या. त्यानंतर विदर्भ अध्यक्ष दामू इंगोले यांनी रिलायन्स विमाकंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदला बोलावलं.

त्यांना पीक विमा (Crop Insurance) संदर्भात जाब विचारला. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. स्वाभिमानीचे विदर्भ प्रमुख दामू इंगोले आक्रमक होऊन संबंधित कंपनीच्या कर्मचार्‍यांना चांगलाच चोप दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या समस्या लवकर सोडवल्या नाहीत तर यापुढे पीक विमा कंपनीचं ऑफिस फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com