Kolhapur North Election: महात्मा गांधींची नोट चालली - राजू शेट्टींची प्रतिक्रिया

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत महात्मा गांधींची नोट चालली आणि दोघांनी ती वाटली, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
Kolhapur North Election: महात्मा गांधींची नोट चालली - राजू शेट्टींची प्रतिक्रिया
Kolhapur North Election: महात्मा गांधींची नोट चालली - राजू शेट्टींची प्रतिक्रियाSaam Tv

पुणे - कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत महात्मा गांधींची नोट चालली आणि दोघांनी ती वाटली, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर निवडणुकीच्या निकालाने आमच्यावर काहीच फरक पडत नाही, असेही त्यांनी बोलून दाखवले. (Swabhimani Shetkari Leader Raju Shetty on Kolhapur North Bi Election)

राज्यात अतिशय प्रतिष्ठेची ठरलेली निवडणूक म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभेची निवडणूक राज्यातील सर्वच मातब्बर नेते कोल्हापुरात तळ ठोकून होते. आज त्या निवडणुकीचा निकाल लागला. कोल्हापूर उत्तरच्या मतदारांनी आपल्या निवडणुकीचा कौल महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बाजूने दिला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपच्या (Bharatiya Janata Party) सत्यजीत कदम यांचा पराभव केला.

यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी (Raju Shetty) म्हणाले की, कोल्हापूर पोटनिवडणुकीत आम्ही भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे कोण जिंकलं हारलं याने आम्हाला फरक पडत नाही. दोन्ही आघाड्यानी प्रचाराची खालची पातळी गाठली होती, हे लोकशाहीसाठी घातक आहे, असेही शेट्टी म्हणाले. निवडणूक म्हटलं की कोणी जिंकत असतं कोणी हारत असतं, एका निवडणूकीतून महाविकास आघाडीचा निष्कर्ष काढता येणार नाही. हा मतदारसंघ हा शहरी होता. ग्रामीण भागात काय कौल आहे हे बघावं लागेल, असेही शेट्टी म्हणाले.

सध्या राज्यात राजकीय वादळ उठवलेल्या भोंगे प्रकरणावर बोलताना शेट्टी म्हणाले, ''शेतकऱ्यांना रात्रीची वीज दिवसा द्या बाकी दिवसभर काय वाजवायचे ते भोंगे वाजवा आमचं काही म्हणणं नाही.

भारनियमनाचा सर्वाधिक फटका शेतीला, विजेचे वाटप करताना पक्षपात होतो आहे. इतरांना २४ तास वीज आणिशेतकऱ्यांना आठ तास रात्रीची वीज दिली जाते आता त्यात ही कपात केली जाऊ आता तीन तास वीज दिली जाते आहे,''

Kolhapur North Election: महात्मा गांधींची नोट चालली - राजू शेट्टींची प्रतिक्रिया
कोल्हापूर पोट निवडणुकीत 'मविआ'चा डंका, जयश्री जाधवांचा दणदणीत विजय

शेतकऱ्यांना वीज देत नसाल तर त्यांनी वीजेचे बिल का द्यावे, असा सवाल उपस्थित करत शेट्टी म्हणाले, " सगळ्यांनी ठरवून सध्याचे राजकारण सुरू केले आहे. महागाई वाढली आहे शेती साहित्य महागले आहे. आणि महाराष्ट्रात हनुमान चालीसा, मशिदीवरचे भोंगे याचे राजकारण सुरू आहे. दुर्दैवी आहे काय बोलायचे यावर.''

Edtied By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com