नंदुरबार - अतिदुर्गम अक्कलकुवा तालुक्यातील वटफळी, पिंपळखुंटा, जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 5 आरोग्य कर्मचाऱ्यांवर निलबंनाची कारवाई करण्यात आली असून 17 आरोग्य कर्मचाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावड़े यांनी केली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चापड्या-वटफळी येथील रमिलाबाई उबड्या वळवी (वय ३८) यांना ३ ऑक्टोबर रोजी शेतात काम करत असताना विषारी सापाने दंश केल्यानंतर उपचारासाठी पती उबड्या वळवी यांनी त्यांना गावापासून जवळ असलेल्या वटफळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकही कर्मचारी उपस्थित नव्हते.
हे दखल पहा -
अखेर बाइक अॅम्ब्युलन्सने रमिलाबाईला पिंपळखुंटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र पिंपळखुंटा प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधिकारी नसल्याने केंद्रात असलेल्या परिचारिकेने रुग्णाला मोलगी ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. येथेही योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णाला पुन्हा बाइक अॅम्ब्युलन्सने मोलगी ग्रामीण रुग्णालयात नेत असताना. अखेर मोलगीपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बिजरीगव्हाण गावाजवळ रस्त्यातच रमिलाबाई यांचे निधन झाले होते.
सदर महिलेला आरोग्य केंद्रांमध्ये वेळेत उपचार मिळाला असता तर तिचा जीव वाचला असता परंतु वडफळी, जांगठी व पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचारी उपलब्ध नसल्याने सदर महिलेला २० किलोमीटर लांब मोलगी येथे उपचारासाठी घेऊन येत असताना तिचा मृत्यू झाला होता. सदर महिलेचा मृत्यू अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या आरोग्य कर्मचार्यांमुळे झाल्याची तक्रार अक्कलकुवा पंचायत समिति गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या कडे करण्यात आली होती.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा आदेशानुसार सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी यांची नियुक्ति करुण चौकशी समिति नेमण्यात आली होती. चौकशीअंती प्रथमिक आरोग्य बंद असल्याने व आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने ती महिला दगावली असे समोर आले. या चौकशीत 22 कर्मचारी दोषी आढळले याबाबत चौकशी समिती तसेच गट विकास अधिकारी यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कड़े अहवाल सादर केले होते.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी कारवाई करत प्राथमिक आरोग्य केंद्र वडफळीं 1 आरोग्य अधिकारी, 1 औषध निर्माण अधिकारी, पिंपळखूंटा 1 औषध निर्माण अधिकारी, जांगठी 1 आरोग्य अधिकारी, 1 औषध निर्माण अधिकारी यांच्यासह कारवाई करीत या 5 जणांना निलबंन केले तर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील 17 कर्मचाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी दिली.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.