
सोमनाथचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला होता, असे हायकोर्टाने म्हटले होते.
सुप्रीम कोर्टाने हा निर्णय कायम ठेवला आहे.
या प्रकरणामुळे पोलीस कोठडीत होणाऱ्या अत्याचारांची दखल घेण्यात आली आहे.
मानवाधिकार संरक्षणासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयानं मोठा धक्का दिलाय. उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत, दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीतच झाला असून त्याला पोलीसच जबाबदार असल्याचं स्पष्ट झालंय. औरंगाबाद खंडपीठानं आदेश देऊनही पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांवर न्यायालयाचा अवमान केल्याचाही गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी प्रकाश आंबेडकारांनी केलीय.
सोमनाथ सूर्यवंशीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय घडलं पाहूयात.
परभणीत संविधान विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन
आंदोलनात सहभागी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांकडून अटक
पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
हद्यविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा पोलिसांचा दावा
पोलिसांचा दावा फेटाळत हायकोर्टाचे पोलिसांवरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशनात जे.जे रुग्णालयाच्या अहवालाचा दाखला देत, सूर्यवंशी याचा मृत्यू एका विशिष्ट सिंड्रोममुळे झाल्याचा दावा केला होता. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी याप्रकरणी राज्य सरकारलाच जबाबदार धरलं आहे. दुसरीकडे चौकशीअंती पोलिसांच्या नावे गुन्हा नोंदवायचा का हे ठरवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलयं.
दरम्यान कोठडीत मृत्यू झाल्यानंतर त्याचा चौकशी अहवाल आल्यावर पुढे काय कारवाई करावी, या संदर्भात कायद्यात तरतूद नाहीय. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यात कोम्बिंग ऑपरेशनची नोंद घेतल्यानं ऑपरेशनमध्ये सहभागी अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो.
मात्र सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. आता सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब झाल्यानंतर आरोपी पोलिसांवर कारवाई होऊन सोमनाथच्या आईला न्याय मिळणार का? याकडे अनेकाचं लक्ष लागलयं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.