शिवसेना कुणाची? शिंदे की ठाकरेंची? धनुष्यबाण कुणाकडे राहणार?

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील या ऐतिहासिक लढतीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Supreme Court to deliver key verdict in Shiv Sena symbol dispute between Uddhav Thackeray and Eknath Shinde on November 12.
Supreme Court to deliver key verdict in Shiv Sena symbol dispute between Uddhav Thackeray and Eknath Shinde on November 12.Saam Tv
Published On

महापालिका निवडणुका तोंडावर आहेत.. अशात खरी शिवसेना कुणाची? असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आलाय.. त्याला कारण ठरलयं... 12 नोव्हेंबरला शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादावर सर्वोच्च न्यायालयात होणारी अंतिम सुनावणी.. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.. त्यामुळे सुनावणीत एकनाथ शिंदे यांचे विमान सर्वोच्च न्यायालय जमिनीवर पाडणार का? हे लवकरच कळेल असा खोचक टोला कायदेतज्ञ्ज्ञ असीम सरोदेंनी लगावलाय...

गेल्या 3 वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा खटला सुरु आहे.. अशातच न्यायाधीश सूर्यकांत 12 नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीत नेमका काय निकाल देतात? याकडे दोन्ही पक्षाचं लक्ष लागलयं... मात्र आता तरी अंतिम निकाल लागणार का .. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार? की पुन्हा तारीख पे तारीख ...? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com