Maharashtra Politics : ज्यांना घर सांभाळता येत नसेल त्यांनी घर फोडण्याचे आरोप करू नये; खासदार विखेंचा नाना पटोलेंना टोला

अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज अहमदनगर मध्ये बोलताना नाशिक पदवीधर निवडणुकीच्या बाबत काँग्रेस पक्षावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

सुशिल थोरात

Ahmednagar News : अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज अहमदनगर मध्ये बोलताना नाशिक पदवीधर निवडणुकीच्या बाबत काँग्रेस पक्षावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. ज्यांना घर सांभाळता येत नसतील त्यांनी घर फोडण्याचे आरोप करू नये आहे त्या लोकांना योग्य तो मानसन्मान दिला असता तर असे प्रसंग येत नाही मी सुद्धा पक्ष सोडला, पक्ष माझ्यासाठी तिकीट आणू शकला नाही यांनी राष्ट्रवादी काँग्रेस समोर पूर्ण समर्पण केलं होतं असा खोचक टोला त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लावला आहे.

Maharashtra Politics
Shivraj Rakshe : ...आता राज्य सरकारने नोकरीची संधी द्यावी; ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षे याची मागणी

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी बाबत बोलताना सुजय विखे पाटील यांनी सांगितले की उमेदवाराच आम्हाला महत्व नाही आम्हाला पक्ष आदेश हाच अंतिम राहतो. ज्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि बावनकुळे साहेब मतदान करायचा आदेश देतील त्याचं प्रामाणिक संघटनेच्या माध्यमातून काम करू त्याच उमेदवाराला मी निवडून देऊ असे देखील सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) म्हणाले.

Maharashtra Politics
Political News : महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर घरफोडी करत असल्याचा आरोप केला त्यावर बोलताना खा सुजय विखे पाटील म्हणाले की, घर फोडणीच्या राजकारणाची परंपरा ही महाराष्ट्रात कोणी सुरू केली आणि त्या परंपरेमुळ किती घर उध्वस्त झाली. लोकांचा वापर करून फेकून देणे ही परंपरा कोणी आणि कोणाच्या घराण्याने सुरू केली हे त्यांनी महाराष्ट्राचे इतिहासात झाकून पाहिलं तर याचे उत्तर त्यांना मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com