बीड : बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार Heavy Rain कायम असून पावसामुळे बीडकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत असल्यामुळे, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यातच मांजरा धरणाचे Manjara Dam 18 दरवाजे उघडल्यामुळे मांजरा नदी काठाला महापुराचे स्वरूप आले आहे. (Successful evacuation of 52 people trapped in flood waters in Beed)
अंबाजोगाई तालुक्यातील देवळा, आपेगावामध्ये महापूराचे पाणी शिरले आहे. तसेच शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची जनावरे वाहून गेली असून शेतामध्ये पाण्यात अडकल्यालेल्या 52 जणांना रेस्क्यू करण्यात बचाव पथकाच्या टीमला यश आले आहे. मात्र देवळा गावांमध्ये अद्याप देखील मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
दरम्यान मांजरा नदीकाठच्या इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासन अलर्ट आहे. देवळा गावातील मंदिर पाण्यात गेले असून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.