Omicorn Variant: राज्यात आजपासून कडक निर्बंध!

महाराष्ट्र्रात गेल्या २४ तासात ओमिक्रॉनचे १९८ तर कोरोनाचे ५३६८ नवे रुग्ण
Omicorn Variant: राज्यात आजपासून कडक निर्बंध!
Omicorn Variant: राज्यात आजपासून कडक निर्बंध! Saam TV
Published On

मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्यामध्ये अचानक वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनी चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस नव्या कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचाही धोका वाढला आहे.

हे देखील पहा -

मुंबईत गेल्या 24 तासांत 3671 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 11,360 आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये 16375 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात 5368 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 22 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे राज्यात ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या देखील वाढत चालली आहे. गेल्या 24 तासात राज्यात ओमिक्रॉनचे 198 नवीन रुग्ण आढळून आले आहे. या 198 रुग्णांपैकी 190 रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. दरम्यन, राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 450 रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

Omicorn Variant: राज्यात आजपासून कडक निर्बंध!
नंदुरबार: दोन दिवसात १७० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

असे असतील नियम -

🔶 लग्न समारंभ हे बंदिस्त जागेत असो किंवा मोकळ्या जागेत असो, उपस्थितांची कमाल संख्या ही 50 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

🔷 कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम, मग तो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो. तो बंदिस्त जागेत असो किंवा मोकळ्या जागेत असो, उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल.

🔶 अंतिम संस्काराला जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

🔷 राज्याच्या कोणत्याही भागातील पर्यटन स्थळे, गर्दीला आकर्षित करणारी इतर ठिकाणे जसे की मोकळी मैदान, इत्यादी ठिकाणी कलम 144 लागू असेल.

🔶 कोरोनाबाबतचे आधीचे निर्बंधही कायम राहातील.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com