"पक्षाच्या नेते मंडळींनी 'असंगाशी संग' केल्याने, आम्ही आजीचे माजी झालो"

शेकापचा पराभव हा रायगडच्या शिखंडीने केला.
"पक्षाच्या नेते मंडळींनी 'असंगाशी संग' केल्याने, आम्ही आजीचे माजी झालो"
"पक्षाच्या नेते मंडळींनी 'असंगाशी संग' केल्याने, आम्ही आजीचे माजी झालो"राजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगडमध्ये शेकापचे एकेकाळी वर्चस्व होते. मात्र शेकापच्या नेतृत्वाने विधानसभा निवडणुकीत असंगाशी संग केल्याने जिल्ह्यातील शेकापचे आमदार MLA हे आजीचे माजी झाले तसेच शेकापचा पराभव हा रायगडच्या शिखंडीने केला असा आरोप नाव न घेता सुनील तटकरे Sunil Tatkare याच्यावर माजी आमदार पंडित पाटील Pandit Patil यांनी आपल्या भाषणातून केला आहे. यावेळी त्यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि पालकमंत्री अदिती तटकरे Aditi Tatkare यांच्यावरही टीका केली आहे. अलिबागचा पुढचा आमदार हा शेकापचाच असेल असं आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिलं आहे. (Statement of former MLA Pandit Patil)

हे देखील पहा -

आगामी येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या Municipal elections अनुषंगाने अलिबाग शहरातील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी शेकाप कार्यकर्ता मेळावा आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. माजी आमदार पंडित पाटील यांनी यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र ओढले. शेकाप पक्ष हा नेहमी मदतीला धावून येणारा पक्ष आहे. मात्र 2019 च्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत पक्षाने मित्र पक्षाला मदतीचा हात केला. पण पक्षाच्या नेतृत्वाने असंगाशी संग केल्याने शेकापचे आमदार हे आजीचे माजी झाले. पक्षाची धोरण ही त्यावेळी चुकली हे मान्य असले तरी रायगडच्या शिखंडीने आमचा पराभव केला असे टीकास्त्र तटकरे यांचे नाव न घेता सोडले.

"पक्षाच्या नेते मंडळींनी 'असंगाशी संग' केल्याने, आम्ही आजीचे माजी झालो"
राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही - गुलाबराव पाटील

कोरोना काळात Corona Period जनतेला मदतीची गरज असताना अलिबागचे आमदार हे घरात बसून होते. अशी टीका पंडित पाटील यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी MLA Mahendra Dalavi याच्यावर केली. रायगडच्या पालकमंत्री Raigad Guardian Minister ह्या फोटो सेशन करण्यात व्यस्त असून कामाच्या नावाने मात्र बोंब आहे. अनेक कामांना अद्याप निधीही पालकमंत्री आणू शकल्या नाहीत. अशी टीका पाटील यांनी भाषणातून केली आहे. त्यामुळे आगामी काळात शेकाप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com