राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनाच कोरोना नियमांचा विसर, कार्यक्रमात गर्दी

मात्र याचाच विसर आरोग्य मंत्र्यांना पडला की काय असा प्रश्न पडतो आहे.
Rajesh Tope
Rajesh TopeSaam TV
Published On

कैलास चौधरी

उस्मानाबाद: राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे आज उस्मानाबाद जिल्हा (Osmanabad District) दौऱ्यावर होते या दरम्यान आरोग्य मंत्री टोपे यांनी कोरोना नियमांची अक्षरशः पायमल्ली केल्याचे पाहायला मिळाले. राजेश टोपे हे आज खाजगी सोयाबीन सोलव्हंट प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. दरम्यान कार्यक्रम वेळी कोरोना (Corona) नियमांची ऐशी तैशी करण्यात आली. जिल्ह्यासह राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे सामान्य लोकांबरोबर सर्वच लोक अडचणीत आहेत, या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सामान्य लोकांना वेगवेगळ्या नियमखाली भरडले गेले आहेत.

मात्र याचाच विसर आरोग्य मंत्र्यांना पडला की काय असा प्रश्न पडतो आहे. मास्क नाही वापरला, सोशल डिस्टन्स यासह इतर नियम घालून सामान्य लोकांना दंडाच्या नावाखाली पिळले जात आहे. मात्र या पैकी कुठलाही नियम या कार्यक्रमांत ठेण्यात आला नाही. खुद्द आरोग्य मंत्री टोपे आणि सार्वजनिक बांधकाम व पर्यावरण मंत्री संजय बनसोडे हे दोघे नियम मोडत असल्याने इतर लोकांनी तोंडावरील मास्क हटवल्याचे पाहायला मिळत होते त्या सोबतच शिक्षक आ. विक्रम काळे हे कोरोना नियम पाळण्यासाठी उपदेश देत होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com