कन्नड तालुक्यांतील परिस्थितीचा राज्य शासनातर्फे आढावा!

कन्नड तालुक्यांत अतिवृष्टीमुळे औरंगाबाद-धुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून या घाटात जवळपास 800 पेक्षा जास्त गाड्या अडकल्या आहेत.
कन्नड तालुक्यांतील परिस्थितीचा राज्य शासनातर्फे आढावा!
कन्नड तालुक्यांतील परिस्थितीचा राज्य शासनातर्फे आढावा!रामनाथ दवणे
Published On

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातीमधील कन्नड तालुक्यांत अतिवृष्टीमुळे औरंगाबाद-धुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून या घाटात जवळपास 800 पेक्षा जास्त गाड्या अडकल्या आहेत तर एका ट्रक चालकाचा मृत्युही झाला आहे. याच पार्श्वभूमिवर कन्नड घाटातील भूस्सखलानामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य सरकारच्या वतीने मुंबईमधील सह्याद्री आतिथीगृहामध्ये आढावा घेण्यात आला.State Government reviews the situation in Kannada taluka

हे देखील पहा-

या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे अनेक भागात या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहे.

कन्नड तालुक्यांतील परिस्थितीचा राज्य शासनातर्फे आढावा!
काही जण सुपात, तर काही जण जात्यात आहेत'; चंद्रकांत पाटलांचा 'मविआ'च्या नेत्यांना इशारा!

दरम्यान या सर्व परिस्थितीचा आढावा आज राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आला असून कन्नड घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. कन्नड तालुक्यांचे आमदार यासाठी प्रयत्नशील असून ज्या ज्या भागात पावसामुळे नुकसान झाले आहे, अशा सर्व ठिकाणी ताबडतोब मदत पोहतविण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत. तसेच पीडितांना तात्काळ जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदत करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाईंनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com