ST Driver : एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पैठण तालुक्यातील झिने चांगतपुरी फाटा चनकवाडी येथील घटना
ST Driver : एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
ST Driver : एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्यालक्ष्मण सोळुंखे
Published On

जालना : जालन्यातील अंबड बस आगारात चालक कम वाहक म्हणून, काम करणाऱ्या एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पैठण तालुक्यातील चांगतपुरी फाटा चनकवाडी या ठिकाणी काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. शंकर झिने असे आत्महत्या केलेल्या 26 वर्षीय एस टी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

हे देखील पहा-

2019 मध्ये ते एसटी सेवेत दाखल झाले होते. 2020 पासून त्यांनी प्रत्यक्ष सेवा द्यायला सुरुवात केली होती. काल ड्युटी संपल्यानंतर झिने हे पैठण तालुक्यातील त्यांच्या गावी चांगतपुरी फाटा चनकवाडी या ठिकाणी गेले होते. त्याठिकाणी त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

ST Driver : एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक

शंकर झिने हे संपात सहभागी झाल्याने त्यांच्या विरुद्ध महामंडळ प्रशासनाने सेवा समाप्ती नोटीस त्यांना बजावली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याच नैर्याशातून आणि आर्थिक विवंचनेतुनच त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. झिने यांच्या आत्महत्येमुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com