एसटीच्या तिकिट मशीन नादुरुस्त; पुन्हा सुरु झाली 'टिक टिक'

कोरोनासंसर्गामुळे (Coronavirus) गेल्या दीडवर्षांपासून अधिक काळ बससेवा बंद होती.
एसटीच्या तिकिट मशीन नादुरुस्त; पुन्हा सुरु झाली 'टिक टिक'
एसटीच्या तिकिट मशीन नादुरुस्त; पुन्हा सुरु झाली 'टिक टिक'Saam Tv
Published On

संजय राठोड

यवतमाळ: कोरोनासंसर्गामुळे (Coronavirus) गेल्या दीडवर्षांपासून अधिक काळ बससेवा बंद होती. कोरोनाच्या संकटावर मात करीत असताना एसटी रुळावर येत असतानाच आता तिकीट मशीन (ETIM) बिघडल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल चारशे मशीन बंद असून वणी, राळेगाव, दारव्हा, पुसद, उमरखेड आगारात पुन्हा जुन्या पद्धतीने तिकीट काढले जात आहे. परिणामी एसटीत पुन्हा टिकटिक एकायला येत आहे.

एसटीतील प्रवाशांना ईटीआयएमद्वारे मिळणारे तिकीट बंद होत आहे. जुन्यापद्धतीचे तिकीट आणि त्याला छिद्र करण्यासाठी होणारी टिकटिक पुन्हा एकदा ऐकायला मिळत आहे. ईटीआयएम उपलब्ध करून देणार्‍या कंपनीसोबतचा करार संपुष्टात येत आहे. शिवाय, दुरुस्तीसाठी महामंडळांकडे रक्कम नसल्याचे सांगीतल्या जात आहे. त्यामुळेच आता अनेक बसफेर्‍यामध्ये जुने तिकीट पुन्हा सुरू झाली आहेत.

एसटीच्या तिकिट मशीन नादुरुस्त; पुन्हा सुरु झाली 'टिक टिक'
जिवापेक्षा सेल्फी महत्वाचा ?

यवतमाळ मधील सर्वच आगारात बससेवा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिर्घकाळापासून बंद होत्या. तिकीट काढण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ईटीआय मशीनचा कोरोना काळात वापर झालेला नाही. आता त्या मशीन बंद पडणे, विशिष्ट बटन ऑपरेट न होणे, बॅटरी उतरणे अशा विविध कारणामुळे वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. मशीनची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अशी वेळ आल्याची ओरड वाहकांकडून सुरु आहे. त्यामुळे अनेक मशीन नादुरुस्त आहेत. त्यामुळे एसटीत पुन्हा जूने दिवस समोर आले आहे.

प्रवाशांना ’स्ट्रे’ मधून तिकीट दिली जात असल्याने ’टिकटिक’सुरु झाली आहे. यवतमाळ विभागात 1 हजार 54 ईटीआय मशीन उपलब्ध आहेत. त्यातील 439 मशीन सध्यास्थितीत सुरु असून 407 मशीन बिघडलेल्या आहेत. सध्या अनेक फेर्‍यामध्ये ‘स्ट्रे’सुरु झाले आहे. इटीआयएम मशिन असल्याने एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसह सवलती मिळणार्‍यांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे त्या लोकांना परिणामी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

जिल्ह्यात स्मार्ट कार्ड धारकांची संख्या मोठी आहे. कागद तसेच वेळीच बचत असा दुहेरी उद्देश महामंडळांचा होता. आता ईटीआयएम यंत्र बंद होत असल्याने हे कार्ड रिड करणारे दुसरे कोणतीही यंत्रणा महामंडळाकडे नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक बसफेर्‍या मध्ये ‘टिकटिक’ सुरु झाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com