Viral News : स्पायडरमॅन बेडूक! उडी मारुन भिंतीवर चढतो अन् भडक रंग वापरुन शत्रूला चकवा देतो

Sangli News : सांगली जिल्ह्यातील आमणापूर येथे दुर्मीळ पांढरा बेडूक आढळून आला आहे. या बेडकामुळे नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. या आगळ्या वेगळ्या बेडकाला चुनाम या नावाने ओळखले जाते.
rare frog
rare frogsaam tv
Published On

विजय पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूरच्या वेताळपेठ येथील फोटोग्राफर आनंदा राडे यांच्या स्टुडिओत दुर्मीळ पांढरा बेडूक आढळून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. आनंदा राडे यांना हा पांढऱ्या रंगाचा दुर्मीळ बेडूक दिसून आला. या बेडकाला 'झाड बेडूक' असेही म्हणतात.

याबाबत आंबोली येथील अभ्यासक काका भिसे यांच्याकडून या प्रजातीची खात्री करण्यात आली, काका भिसे म्हणाले, दुर्मीळ पांढरा बेडूक झाडावर किंवा भिंतीवर चढतो. जास्त पाऊस झाला की हा बेडूक बाहेर पडतो. तो नैसर्गिकरीत्या पांढरा असतो. आनंदा राडे यांनी या बेडकाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.

rare frog
गावगुंडांच्या हैदोसानं डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं; बारामतीच्या 'त्या' तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

क्वचितच आढळून येणारा इंडियन कॉमन ट्री प्रजातीच्या दुर्मीळ बेडकाची प्रथम 1830 मध्ये जॉन अँडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली. दक्षिण आशियामध्ये हा बेडूक मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच कोकणासह अतिवृष्टीच्या ठिकाणी जास्त दिसतो. या बेडकाला 'चुनाम' या नावानेही ओळखले जाते, तर संस्कृतमध्ये याला 'चुर्ण' असे म्हटले जाते. जंगलात किंवा एखाद्या गावात झाड आणि ओलावा असेल तर हे बेडूक येतात.

rare frog
AC कोचमधून प्रवास करायची हिंमत कशी होते? ड्युटीवर निघालेल्या जवानांशी माजोरड्या TTE ने घातला वाद अन् नंतर...; पाहा तुम्हीच व्हिडिओ

पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एक झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो. झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट थाळीसारखा झालेला असतो. बेडकांच्या पायावर आतील बाजूस गडद रंगाचे पट्टे असतात. ते बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात. शरीरावरील भडक रंगाचा वापर करुन हा बेडूक शत्रूला चकवतो, स्वत:चा बचाव करतो. असे बेडूक आढळणे हे त्या परिसरात पर्यावरणीय गुणवत्ता उत्तम असल्याचे प्रतीक मानले जाते.

rare frog
Beed News : पोहायला गेला तो परतलाच नाही, अभियंत्याचा बुडून मृत्यू; आठ तास शोधल्यानंतर मिळाला मृतदेह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com