Special Report : माढ्यात रंगत वाढणार!फडणवीस vs पवार!

Maharashtra Election 2024: सोलापुरात मोहिते- पवारांची दोस्ती पुन्हा जमल्यामुळे भाजपची चिंता वाढलीय.

Madha Lok Sabha Election 2024: माढ्यातून मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत. माढ्याच्या लढतीला आता पवार विरुद्ध फडणवीस असं स्वरुप आलंय. उत्तम जानकर यांची नाराजी दूर करण्यातही फडणवीसांना यश मिळालं तरीही माढ्यात शरद पवारांनी भाजपची केलेली कोंडी फडणवीस कशी फोडणार? तेच या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत. सोलापुरात मोहिते- पवारांची दोस्ती पुन्हा जमल्यामुळे भाजपची चिंता वाढलीय.. माढ्याच्या लढतीचे पडसाद इतर मतदारसंघात उमटले तर 45चा आकडा गाठणं भाजपचं स्वप्नचं राहणार आहे..म्हणूनच सोलापूरच्या मैदानात डॅमेज कंट्रोलसाठी उतरलेले देवेंद्र फडणवीस काय खेळी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

माढ्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत.. नाराज उत्तम जानकरांची मनधरणी करून फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांची पडती बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केलाय.. विशेष म्हणजे उत्तम जानकरांना आणण्य़ासाठी फडणवीसांनी प्रायव्हेट जेटची सोय केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com