Special Report : शेतकऱ्याचा नाद नाही करायचा; शेतकऱ्यांनं खरेदी केला 21 लाखांचा 'किटली'

Special Report : हौसेला मोल नाही, असं म्हटलं जातं. मात्र हीच हौस पुरविण्यासाठी पुण्याच्या खेड तालुक्यातील तिन्हेवाडी येथील एका शेतकऱ्याने किटली नावाच्या बैलासाठी तब्बल 21 लाख रुपये मोजले आहेत.
Special Report
Special ReportSaam Digital

गिरीश निकम, साम टीव्ही प्रतिनिधी

हौसेला मोल नाही, असं म्हटलं जातं. मात्र हीच हौस पुरविण्यासाठी पुण्याच्या खेड तालुक्यातील तिन्हेवाडी येथील एका शेतकऱ्याने तब्बल 21 लाख रुपये मोजले आहेत. एव्हढी लाखमोलाची काय खरेदी केलीये या शेतक-यानं पाहूया या रिपोर्टमधून.

काहीही करायचं पण शेतकऱ्याचा नाद नाही करायचा, अशा डायलॉगवर शिट्यांचा, टाळ्यांचा जोरदार पाऊस पडतो. असाच एक नाद पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका शेतकऱ्याने केला आहे. तिन्हेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाचारणे बैलगाडा शर्यतीचे शौकीन आहेत. एका शर्यतीत वा-याच्या वेगानं धावणा-या किटली नावाच्या बैलाला त्यांनी पाहिलं आणि त्यांना त्याची भुरळच पडली. मग काय काही करुन किटलीला खरेदी करायचं असा चंगच त्यांनी बांधला.

त्यासाठी त्यांनी एक लाख नाही दोन लाख नाही तर तब्बल 21 लाख रुपये मोजले आहेत. वाजतगाजत मोठ्या जल्लोषात त्यांनी किटलीला गावात आणलं. आलिशान कार घ्यायची म्हटली तरी 20 लाखांपेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागते. पाचारणे यांनी तर 21 लाख रुपये देऊन ‘किटली’ खरेदी केला. विशेष म्हणजे या बैलाला लहानपणी लम्पी आजार झाला होता. मृत्यूच्या दारातून परत आलेला किटली आता बैलगाडा शर्यत गाजवतोय. हे विशेष

Special Report
Ajit Pawar vs Anjali Damania : पुणे अपघात प्रकरणावरून राजकारण तापलं; अंजली दमानियांनीही अजित पवारांचं आव्हान स्वीकारलं

या महागड्या किटलीची खेड पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. हौसेला मोल नसतं असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय तिन्हेवाडी गावात येतोय. नवीन मालकाबरोबर किटली आता किती बैलगाडा स्पर्धा गाजवणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

Special Report
Ajit Pawar On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या महाडमधील कृतीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com