बंद घराची किल्ली गेली चोरीला अन् प्रेमविवाह केलेल्या जावयाने सासुच्या दागिण्यांवर डल्ला मारला

नाशिकमधील ध्रुवनगर येथील बंद घराची एक किल्ली चोरीला गेली होती. त्यानंतर त्याच घरातून साडेदहा लाखांचे सोने चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
Nashik Crime
Nashik CrimeSaam TV
Published On

तबरेज शेख -

नाशिक: बेरोजगारीमुळे त्रस्त झालेले आणि खर्चायला देखील पैसे नसल्यामुळे अनेक जणांनी चोरी केल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत. मात्र, बेरोजगारीमुळे जवळ पैसे नाहीत म्हणून आपल्या सासरीच दरोडा टाकणारा चोर आजपर्यंत कोणी पाहिला नसेल.

मात्र, असा जावई चोर नाशिकमध्ये (Nashik) सापडला आहे. या बेरोजगार जावयाने थेट सासूच्याच दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. सासूच्या तक्रारीनंतर प्रेमविवाह केलेल्या बेरोजगार जावायला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीसांच्या ताब्यात असलेला या जावयाने आपणच सासुबाईंच्या दहा लाखांच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली देखईल दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील ध्रुवनगर येथील बंद घराची एक किल्ली चोरीला गेली होती. त्यानंतर त्याच घरातून साडेदहा लाखांचे सोने चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात (Police Station) मीरा गंभीरे यांनी दिली होती. त्यानुसार पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

पोलिसांनी तपास सुरु केला असता या परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली त्यावेळी तक्रारदार गंभीरे यांचा जावई आलोक याच्या देहबोलीसारख्या एका इसमाचा व्हिडिओ पोलीसांच्या हाती लागला. या व्हिडीओच्या आधारे पोलीसांनी लागली जावई आलोक याला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरु केली.

Nashik Crime
Nagpur Crime News: वीस लाख लुटणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश; १४ लाखाची रक्‍कम हस्‍तगत

पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच चोरट्या जावयाने आपणच मध्यरात्री दागिने चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती गंगापूर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस रियाज शेख यांनी दिली आहे. तसंच जावायचा नेहमी घरी वावर असल्याने घरातील वातावरणाची त्याला चांगली कल्पना होती.

याचाच गैरफायदा घेत जावई आलोकने महिला पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या सासूच्या दागिन्यावर डल्ला मारला. मात्र, अवघ्या काही तासातच जावयाचा प्लॅनचा पर्दाफाश केला आहे. खरंतर जावई माझा भला अशी एक मराठीत म्हण आहे. परंतु नाशिकच्या घटनेत जावई माझा निघाला चोर असे म्हणण्याची वेळ आली आहे. एकूणच या चोरीच्या घटणेपेक्षा जावयाने केलेला चोरीचा पराक्रम चर्चेचा विषय ठरत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com