Mohol News: नगर परिषदेला बांधले उलट्या घागरीचे तोरण; पाणी प्रश्नावरून मटका फोडून आंदोलन

नगर परिषदेला बांधले उलट्या घागरीचे तोरण; पाणी प्रश्नावरून मटका फोडून आंदोलन
Mohol News
Mohol NewsSaam tv

सोलापूर : मोहोळ शहरात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी प्रश्‍नाबाबत (Water Crisis) क्रांतीज्योती संघटना आक्रमक झाली असून (Mohol) मोहोळ नगरपरिषदेच्‍या समोर मटका फोडून आंदोलन करण्यात आले. तसेच उलट्या घागरीचे तोरण बांधले. (Breaking Marathi News)

Mohol News
Parbhani News: घराच्‍या मोकळ्या जागेत झोपल्‍याने परिवार बचावला; आगीत धान्‍य, रोख रक्‍कमेसह साहित्‍याचा कोळसा

मोहोळ शहरात पाणी प्रश्न बिकट झाला आहे. गेल्‍या काही दिवसांपासून शहरवासीयांना पाणी मिळत नसून उन्‍हाळ्यात भटकंती करावी लागत आहे. यामुळे क्रांतीज्योती संघटनेकडून मोहोळ नगरपरिषदेवर उलट्या घागरींचा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मोहोळ नगरपालिकेसमोर क्रांतीज्योती संघटनेच्या (Solapur News) पदाधिकाऱ्यांनी मटके फोडून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेसमोर उलट्या घागरीचे तोरण बांधून आंदोलन करण्यात आले आहे.

Mohol News
Dombivali News: सामान बाजूला घ्यायला लावले म्‍हणून पादचाऱ्याला मारहाण; डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची दादागिरी

आंदोलन तिव्र करण्याचा इशारा

मोहोळ शहरात पाण्याची परिस्थिती बिकट होत आहे. मोहोळ नगर परिषदेकडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाबाबत नियोजन केले जात नाही. नदीला मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येत्या दोन दिवसात मोहोळ शहरातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com