Solapur: दलित समाजावरील अन्यायाविरोधात 'जातियतेची हंडीफोड आंदोलन'

दलित समाजावरील अन्यायाविरोधात 'जातियतेची हंडीफोड आंदोलन'
Solapur News
Solapur NewsSaam tv

सोलापूर : देशभरात दलित समाजातील व्यक्तींवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात सर्वपक्षीय दलित अन्याय अत्याचार (Solapur News) विरोधी युवा संघटनेच्यावतीने आज चातुर्वर्णाची प्रतिकात्मक हंडी फोड आंदोलन करण्यात आले. युवा पॅंथर सामाजिक संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत हंडी फोड आंदोलनामध्ये सर्व युवक सहभागी झाले. (Solapur Today News)

Solapur News
Cyber Crime: वीज बिल भरायची बनावट लिंक पाठवून ४ लाखाची फसवणूक

सोलापुरातील (Solapur) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सदरचे आंदोलन करण्यात आले. सुरवातीला जातीवादी मानसिकतेचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर चातुर्वणाची हंडी फोडून या अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर औरंगाबादमधील (Aurangabad) पिसादेवी येथे जमिनीच्या वादावरून मातंग समाजाच्या व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या करण्यात आली. त्या विरोधात हे आंदोलन असल्याचे युवा पॅंथरच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अन्‍याय कधी थांबेल

संपूर्ण देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना दलितांवर होणारे अन्याय अत्याचार हे भारत स्वतंत्र झाला तरी कधी थांबणार? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com